सिटी बेल लाइव्ह । उरण । घनःश्याम कडू । 🔷🔶🔷
खुली मिठाई विकताना विक्रेत्यांनी मिठाईसमोर तिच्या एक्सपायरी डेटचे फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. 1 ऑक्टोबरपासून या नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने मिठाई विक्रेत्यांना दिले आहेत. काही दिवस उलटूनही अद्यापही मिठाई विक्रेत्यांनी या नियमांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केलेली नाही.
सणासुदीच्या काळात शिळी मिठाई खाल्ल्याने होणार्या विषबाधेच्या घटनांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने एक्सपायरी डेट लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 ऑक्टोबरपासून हे नियम अंमलात आले आहेत.
परंतु उरण-पनवेलमधील अनेक मिठाई विक्रेत्यांनी त्याची अंमलबजावणी अद्याप सुरु केली नाही. त्यामुळे अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.








Be First to Comment