Press "Enter" to skip to content

खालापूर नगरपंचायत अतिक्रमणा विरोधात आक्रमक : कारवाईचा बडगा उचलणार


सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । 🔶🔷🔶

नगरपंचायत हद्दीत व्यावसायिक आणि कार्यालयीन कामासाठी अतिक्रमण वाढले असून सोमवारी मुख्याधिकारी सुरेखा भणगे आणि उपनगराध्यक्षा शिवानी जंगम यानी अतिक्रमण पाहणी करत काहि ठिकाणी सुरू असलेल काम बंद पाङल.

खालापूर नगरपंचायतीचा विकास आराखङा अद्याप मार्गी लागलेला नाहि.याचा फायदा घेत खालापूर नगरपंचायतीचे जुन्या मुंबई पूणे महामार्गालगत असलेल्या जागेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून गाळे बांधण्यात आले आहेत.बहुतेक अतिक्रमण खालापूर नगरपंचायत हद्द सोङून नजीकच्या घोङवली ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थानी केल आहे.तर काहि जणानी गाळे बांधून विक्री व भाङ्यानी देण्याचा सपाटा लावला आहे.

सोमवारी खालापूरातील काहि नागरिकांच्या तक्रारिनंतर मुख्याधिकारी सुरेखा भणगे,उपनगराध्यक्षा शिवानी जंगम,अभियंता मोरखंङीकर यानी अतिक्रमण झालेल्या भागाची पाहणी केली.एका ठिकाणी सुरू असलेले  बांधकाम नगरपंचायतीची कोणतीहि परवानगी न घेता सुरू असल्याने तात्काळ थांबविण्यात आले.अतिक्रमण झालेले सर्व कामे नोटीस देवून पाङण्यात येतील असे उपनगराध्यक्षा शिवानी जंगम यानी सांगितले.

काही जागा ग्रामपंचायत काळात देण्यात आल्या होत्या.परंतु विक्री आणि भाङ्यानी देण्याचे प्रकार घङले आहेत.तसेच आजूबाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे.सर्वांवर कारवाई करण्यात येईल.

शिवानी जंगम -उपनगराध्यक्षा खालापूर नगरपंचायत

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.