Press "Enter" to skip to content

वाढीव वीज बिल संदर्भातील किशोर म्हात्रे याचे उपोषण स्थगित !

पाली तहसिलदारांची यशस्वी मध्यस्ती ! 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । विनोद भोईर । पाली । 💠🌟💠

कोरोना महामारीच्या संकटाने सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळित झालेले असताना अशातच महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना पाठविलेल्या वाढीव वीज बिलाने सर्वसामान्य नागरिकांचे अक्षरशः कंबरडे मोडले असून याबाबत शासन स्तरावर कोणताच निर्णय घेतला जात नसल्याचे दिसून आल्याने जनहितार्थ सामान्य नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी भारतीय जनता पार्टी चे माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोर म्हात्रे यांनी पाली येथील महावितरणच्या कार्यालयासमोर . दि . 5 ऑक्टोंबर रोजी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते.

त्या संदर्भात सुधागड – पाली तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी उपोषणकर्ते किशोर म्हात्रे यांच्या बरोबर चर्चे साठी त्याच दिवशी दुपारी 12 वाजता पाली तहसील कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत महावितरणचे पाली येथील उपअभियंता जतीन पाटील हे देखील उपस्थित होते.

त्यावेळी उपोषणकर्ते याच्या मागण्या बाबत सविस्तर चर्चा करून त्या तत्काळ पूर्ण करण्यात येतील अशे लेखी स्वरूपात पत्र देण्यात आले .
@ मान्य केल्या मागण्या @

# वाढीव वीज बिल दुरुस्त करण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ती गर्दी कमी करण्यासाठी नियोजन करण्यात येईल

काही वीज ग्राहकांना आलेली चुकीची वीज बिल तात्काळ दुरुस्त करण्यात येतील.

व्याज माफी करणे हा धोरणात्मक निर्णय असल्याने उपोषणकर्ते याची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे कळविण्यात येईल .

लेखी स्वरूपात मान्य केलेल्या मागण्याची प्रत्येक्षात पूर्तता न केल्यास आत्मदहन करण्याचा ईशारा उपोषणकर्ते किशोर म्हात्रे यांनी महावितरण कंपनीला दिला आहे .

या बैठकीला भाजपाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, नागोठणे माजी सरपंच विलास चौलकर, भाजपा रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, भाजपा रोहा तालुका सरचिटणीस आनंद लाड, एकनाथ जांबेकर, लहू तेलंगे, शामकांत नेरपगार, ऍड. महेश पवार, नागोठणे माजी उपसरपंच सुनिल लाड, रिपाईचे तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड, दिनेश घाग, तुळशीराम म्हात्रे अंकुश सुटे, रोहिदास हातनोलकर, भाजपा अल्पसंख्यांक सेलचे रोहा तालुका अध्यक्ष रऊफ कडवेकर, हिरामण तांबोळी, विजय पाटील, परशुराम बैकर, संतोष बैकर, नितीन पाटील, अनिकेत म्हात्रे, गौरव म्हात्रे, जय म्हात्रे आदि उपस्थित होते .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.