Press "Enter" to skip to content

रोहा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्याग्रह

सिटी बेल लाइव्ह । याकुब सय्यद । रोहा । 🔷🔶🔷


हाथरस येथील बलात्कार पिढीच्या कुटुंबाला न्याय द्या या मागणीसाठी काँग्रेस आय पक्षाचे जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्याग्रह करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार रोहा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने आज सत्याग्रह करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तसेच हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या कुटुंबाला न्याय द्यावा तसेच राहुल गांधी व अखिल भारतीय सरचिटणीस श्रीमती प्रियांका गांधी यांना पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल रोहा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला.

यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष निजाम भाई सय्यद, काँग्रेस आय महाराष्ट्रप्रदेश सदस्य समीर भाई सकपाल, रोहा तालुका अल्पसंख्याक समाज तालुकाध्यक्ष याकूब सय्यद, अल्पसंख्याक समाज सदस्य चोरडेकर, नागोठणे शहराध्यक्ष अशपाक पानसरे, साळवी, सरफराज सिंधी, सोहेब सय्यद तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.