सिटी बेल लाइव्ह । कळंबोली । प्रतिनिधी । 🔶🔷🔶
“एक ओंकार” हाँस्पिटलचे डाँक्टर डाँ. मुकुल थोरात यांच्या अविरत परिश्रमाने या हाँस्पिटलमध्ये येणा-या सर्वच कोरोना रुग्णाने कोरोनावर मात केली आहे.
खारघर, पनवेल परिसरातील नागरिकांसाठी “एक ओंकार” हाँस्पिटल वरदान ठरत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून डाँ. मुकुल थोरात व त्यांचे टीमचे अभिनंदन केले जात आहे.
जगभरात कोरोनाने थैमान घातले असून बळीचा आकडे १० लाखाच्या वर गेला आहे. यात कोरोनाने देशातील १ लाखांच्यावर नागरिकांचा बळी घेतला आहे. कोरोनाच्या भयानक महामारीत काही डाँक्टर प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडतााना आपला जीव धोक्यात घालत आहेत.
कोरोना युद्धात योद्धा प्रमाणे लढत कोरोनासी दोन हात करताना रुग्णाना जीवनदान देत आहेत. करोनाच्या या महामारीत “एक ओंकार” हाँस्पिटल परिसरातील नागरिकांना देवाच्या कृपेने वरदान ठरले आहे. या रुग्णालयातील डाँक्टर मुकुल थोरात दिवस रात्र रुग्णांची सेवा करत कोरोनासी अविरात लढत रुग्णाना कोरोनाच्या साथीपासून सुटकारा देत आहेत. या हाँस्पिटलच्या सीईओ वैशाली मँडम या स्वतः सकाळी ७ ते रात्री १२ वाजे पर्यत प्रत्येक रुग्णाची भेट घेवून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून आपल्या सहकार्या रुग्णाची माहिती देत आहेत. सर्व सहका-याच्या प्रयत्नाने या रुग्णालयातून दररोज चार ते पाच रुग्ण बरे होवून बाहेर पडत आहेत. या हाँस्पिटलच्या डाँक्टर व त्यांच्या टीमच्या सेवेने कोरोना रुग्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे.
"एक ओंकार" हाँस्पिटलचे डाँक्टर मुकुल थोरात कोरोना रुग्णांची करत असलेल्या अविरत सेवेने रुग्ण कोरोनापासून सुटकेचा श्वास घेत आहेत या हाँस्पिटल मधून दररोज चार-पाच कोरोना रुग्ण कोरोना मुक्त होत आहेत. माझा भावू गजानन पाटील ९५ टक्के कोरोना, निमोनियाचा रुग्ण म्हणून दाखल केला होता तो आता पुर्ण बरा झाला आहे. ते करत असलेल्या रुग्णाच्या सेवेने येथे रुग्ण बरे होण्याचेच प्रमाण आहे.
सुभाष पाटील, आंतरराष्ट्रीय तायक्वाँडो पंच








Be First to Comment