Press "Enter" to skip to content

मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याची बिकट अवस्था

पावसात चिखल तर उन्हात धुरळा : मुंबई-गोवा महामार्गाच्या रस्त्यावरून प्रवास करणे धोक्याचे 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔶🔷🔶


मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याची बिकट अवस्था पाहता पावसात चिखल व खड्डे तर उन्हात धुरळा यामुळे या महामार्गावरून प्रवास करणे अधिक धोक्याचे झाले आहे.असे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशी वर्गातुन बोलले जात आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील, कोलाड, खांब,सुकेळी, वाकण, ‌‌नागोठणे दरम्यान रस्त्याला पावसात पडलेले चिखल व खड्डे यामुळे प्रवास करतांना प्रवासी वर्गाची तारांबळ उडत आहे.बस मधुन प्रवास करतांना होडी मधून बसून प्रवास केल्या सारखे वाटत होते.तर या रस्त्याची बिकट अवस्था पाहता अनेक वेळा वाहनांचे टायर पंम्पचर होऊन दोन तीन तास प्रवाश्यांचा खोळंबा होत आहे.यामुळे वाहतुक कोंडी निर्माण होतआहे.

खड्डयांमुळे मनक्याचे अजार,कंबरदुखी, पोटदूखी, या सारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.या खड्डयांमुळे अपघात होऊन अनेकांना आपला जिव गमवावा लागला आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे.

मुबंई-गोवा हायवेवरील ब्रिटिशकाळातील बनविलेले जुने शिंगल रस्ते अनेक वर्षांपासून उखडलेले नाहीत परंतुु या महामार्गावरील चौपदरी करणात बनविण्यात आणलेले रस्ते दोन महिन्यानंतर वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असुन प्रवासी वर्गाच्या जिवाचा जणू खेळ मांडला आहे.

तर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर खड्डे बुजविण्यासाठी वापरण्यात माती मिश्रित खडी धूळीत रूपांतर होते.हि धूळ मुंबई-गोवा महामार्गावर असणाऱ्या व्यवसायिकांच्या दुकानात पसरून मोठे नुकसान होते.शिवाय हि धुळ या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशी वर्गाच्या अंगावर उडत आहे.

यामुळे ही धुळ नागरिकांच्या नाका तोंडात जाऊन सर्दी,खोकला,व श्वसनाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.तर हि धुळ डोळ्यात जाऊन अपघात धोका निर्माण होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याचे चौपदरीकरणाच्या कामामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल असे वाटत असतांना या महामार्गावरील रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले. परंतुु दहा वर्षे उलटून गेली तरी या महामार्गावरील रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी किती वर्ष लागतील याची खात्री देता येत नाही.

यामुळे चिखल,खड्डे,धूळ यापासुन सुटका होण्यासाठी या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पुर्ण करण्याकरता संबंधितांनी लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशी वर्गातुन केली जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.