सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔷🔶🔷
रोहा तालुक्यांतील कोलाड परिसरातील द.ग.तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलाड येथे गेले अनेक वर्षे लेखनिक म्हणुन कार्य करणाऱ्या उदय पंढरीनाथ घोसाळकर यांना रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचा २०२०-२१ चा आदर्श लेखनिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
उदय पंढरीनाथ घोसाळकर यांना आदर्श लेखनिक पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याची जिल्हा परिषदेने दखल घेतल्याने आपल्या कामाची पोचपावती मिळाल्याचे समाधान त्यांना आहे.
या पुरस्काराबद्दल सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंतराव ओसवाल,सौ गीताताई पालरेचा,सचिव रमाकांत घोसाळकर,विद्यालयाचे प्राचार्य शिरीष येरुणकर,उपप्राचार्य सुखदेव तिरमले,मोहनराव थोरबोले,दादासाहेब हाटे,वसंत थोरात, हनुमंतराव काळे,अविनाश माळी,डी आर पाटील,घोणे सर,यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच आंबेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच व स्कूल कमेटी अध्यक्ष सुरेश महाबळे व सर्व सदस्य,या परिसरातील अनेक मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटुन तर अनेकांनी भ्रमणध्वनी वरुन त्यांचे अभिनंदन केले आहे. आपल्याला मिळालेल्या पुरस्काराबाबत बोलताना ते म्हणाले कि, “मला मिळालेला हा पुरस्कार फक्त माझा नसून तो द.ग.तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राचार्य, सर्वे शिक्षक व कर्मचारी वर्ग या सर्वांचा आहे कारण सर्वाच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे.








Be First to Comment