Press "Enter" to skip to content

महाविद्यालयात सलग 21 वर्ष प्राचार्यपद भूषविणारे युवराज महाजन यांची सेवापूर्ती

पालीतील जे. एन. पालिवाला महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महाजन यांचा सेवापूर्ती समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । विनोद भोईर । पाली । 🔷🔶🔷

येथील शेठ जे. एन. पालिवाला महाविद्यालयात सलग 21 वर्ष प्राचार्यपद भूषविणारे युवराज महाजन यांचा सेवापूर्ती समारंभ नुकताच संपन्न झाला.

प्राचार्य युवराज महाजन यांचे शिस्तबद्ध व आदर्शवत कार्य सर्वानाच प्रेरणा देणारे आहे. असे गौरवोद्गार सु.ए.सो.चे अध्यक्ष वसंतराव ओसवाल यांनी यावेळी काढले. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले गेले पाहिजे, प्रत्येक विद्यार्थाने शैक्षणिक उपक्रमाबरोबर अभ्यासपूरक व अभ्यासेत्तर उपक्रमामध्ये भाग घ्यायला पाहिजे हे सतत 42 वर्षाच्या प्रदीर्घ शिक्षकी पेशातुन प्रामाणिकपणे काम करून महाजन यांनी दाखवून दिले आहे. असे देखील ओसवाल यावेळी म्हणाले.

पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी सांगितले की, महाजन सरांनी आपल्या कारकिर्दीत अनेक विद्यार्थी घडविले, जे आज मोठमोठ्या हुद्द्यावर विराजमान होऊन राष्ट्र उत्कर्षासाठी योगदान देत आहेत.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हाप्रमुख गीता पालरेचा, सुएसो उपाध्यक्ष रवींद्र लिमये, संचालक ग. रा. म्हात्रे, उपप्राचार्य सुधीर पुराणिक, प्रभारी प्राचार्या डॉ अंजली पुराणिक, एम एस लिमन, एस ए पाटील, डॉ. एम. ए. बडगुजर, कार्यालयीन प्रमुख चंद्रकांत चिले, रामनाथ घोसाळकर, स्नेहल पुराणिक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक सु ए सो चे सचिव रविकांत घोसाळकर यांनी केले तसेच प्रभावी सूत्रसंचालन प्रा. अजित खरोसे व आभार प्रा. स्नेहल बेलवलकर यांनी मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.