सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहा । नंदकुमार मरवडे । 🔷🔶🔷
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून रोहे तालुक्यातील देवकान्हे ग्रा.पं.हद्दीत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान म्हणजेच “स्वच्छ भारत अभियान” अंतर्गत ग्रा.पंचायत हद्दीत स्वच्छता अभियान प्रारंभ करण्यात आला आहे.
यावेळी सर्वप्रथम ग्रामपंचायतमधे महात्मा गांधी तसेच लालबहादूर यांच्या जयंती निमित्त महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला
पुष्पमालिका अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरपंच वसंत भोईर, उपसरपंच सूरज कचरे,सदस्य दयाराम भोईर, निलिमा भोईर,व्रुषाली बामणे, ज्ञानेश्वर वाघमारे,विलासनी थिटे,आदिती थिटे,अंगणवाडी सेविका बेबी जवरत,टिकोणे,आरोग्य सेविका कला टेंबे आदींसह ग्रामस्थ व महिलावर्ग उपस्थित होत्या.
या मोहिमेत स्वच्छता मोहिम राबवून संपूर्ण गावे,परिसर व सार्वजनिक ठिकाणे इथली स्वच्छता करून कच-याची विल्हेवाट लावण्यात आली.रहिवासी नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.तर नागरिकांनीही या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवून स्वच्छ सुंदर गावासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले.








Be First to Comment