सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔷🔶🔷
समाजिक कार्यकर्ते महेंद्र चंदन पाटील यांच्या कार्याला सलाम अशी प्रतिक्रिया कर्जत शहरातील डेक्कन जिमखाना परिसरातील नागरिक राजू पोतदार यांनी व्यक्त केली आहे.
कर्जत शहरातील पाटील आळी येथे राहणारे महेंद्र चंदन -पाटील यांच्या घराण्याला तसा राजकीय वारसा, कर्जत नगरपरिषदेच्या स्थापने नंतर मूळचे कांग्रेसचे असलेले मात्र अपक्ष निवडणूक लढवून निवडून आलेले रमेश चंदन -पाटील हे कर्जत नगरपरिषदेचे पहिले नगराध्यक्ष बनण्याचा मान मिळवणारे रमेश चंदन -पाटील यांचे महेंद्र चंदन -पाटील हे पुतणे आहेत.
निवडणूका पार पडल्या कि निवडून आलेल्या प्रभागात पुढील निवडणूकिपर्यंत न फिरकणारे अनेक उमेदवार पहायला मिळतात परंतू निवडून आलेल्या प्रभागाव्यतिरिक्त दुस-या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी वेळेला दुस-या प्रभागातील नागरिकही ज्यांना फोन करतात असे सहकार्य करणारे काही मोजकेच असतात अशाच मोजक्या उमेदवारांमधेमधे महेंद्र बबन चंदन -पाटील यांचे नाव घ्यावे लागेल कर्जत नगरपरिषदेच्या विद्यमान नगरसेविका मधुरा महेंद्र चंदन पाटील यांचे पती मागील निवडणुकीत थोडक्या मतांनी पराभूत झालेल्या महेंद्र चंदन-पाटील यांनी आपले समाजोपयोगी कार्य सुरू ठेवल्यानेच त्यांच्या पत्नीला मतदारांनी विजयी केले.

कर्जतच्या ग्रामदैवत धापाया मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष असलेले महेंद्र चंदन पाटील हे नगरसेविका पत्नी असलेल्या प्रभागासह दुस-या प्रभागातील नागरिकांच्या कोणत्याही अडचणीत मदत करण्यासाठी धाऊन जातात.
काल कचेरी खालील रस्त्यालगत असलेल्या ह्रषिकेश इमारती जवळील गंजलेले लाईटचे पोल रस्त्याचे काम सुरू असतांना वाकल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

यावेळी महेंद्र चंदन-पाटील स्वत: महावितरणाच्या अ़धिका-यांशी तसेच कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्याशी चर्चा करून सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत स्वत: थांबून नविन पोल टाकून घेतले व इमारतीचा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करून घेतला. कोणाच्याही घरी काही दु:खद प्रसंग घडल्यास महेंद्र चंदन पाटील सर्वप्रथम तिथे हजर असतोच शिवाय वेळप्रसंगी अंत्यविधीचा खर्चही स्वत:च करतात असे पक्षिय राजकारण बाजुला ठेवून मदत करणा-या समाज कार्यकर्ता महेंद्र चंदन पाटील ह्याच्या कार्याला सलाम. अशी प्रतिक्रिया डेक्कन जिमखाना परिसरात राहणारे राजू पोतदार यांनी दिली.







Be First to Comment