Press "Enter" to skip to content

दुर्गमावळा परिवारातर्फे द्रोणागिरी संवर्धन मोहीम संपन्न


सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔷🔶🔷

द्रोणागिरी किल्ल्यावर दुर्गमावळा परिवारातर्फे द्रोणागिरी संवर्धन मोहीम आयोजित करण्यात आली होती. यावेळी पायवाटेवर पायऱ्या करण्यात आल्या.
पडलेल्या मुसळधार पावसामुळे द्रोणागिरी किल्यावर डोंगरातून जात असलेल्या पायवाटेवर अनेक ठिकाणी झाडे, दगड गोटे तसेच वाट अवघड बनली होती. त्यामुळे किल्ल्यावर जाणारी वाट किचकट बनली होती. सदर वाट व्यवस्थित करण्यासाठी दुर्गमावळातर्फे द्रोणागिरी संवर्धन मोहीम करण्यात आली.

या मोहिमेत द्रोणागिरी किल्ल्यावर जाणाऱ्या पायवाटेवर पडलेले दगड काढण्यात आले. तसेच निसरडी झालेल्या वाटेवर पायऱ्या करण्यात आल्या.

या मोहिमेत अनेकजण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुर्गमावळातर्फे करण्यात येत असलेल्या या मोहिमेमुळे पर्यटकांना जाण्यासाठी सुलभ अशी पायवाट तयार करण्याचे काम सुरू असल्याने जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.