Press "Enter" to skip to content

खारगाव ग्रा.पंचायत हद्दीत स्वच्छता अभियानास प्रारंभ


सिटी बेल लाइव्ह । नंदकुमार मरवडे/केशव म्हस्के । 🔶🔷🔶


महात्मा गांधी जयंती” चे औचित्य साधून रोहे तालुक्यातील खारगाव ग्रा.पं.हद्दीत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान म्हणजेच “स्वच्छ भारत अभियान” अंतर्गत ग्रा.पंचायत हद्दीत स्वच्छता अभियान प्रारंभ करण्यात आला आहे.

यावेळी सर्वप्रथम खारगाव ग्रामपंचायतमधे महात्मा गांधी तसेच लालबहादूर यांच्या जयंती निमित्त
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी सरपंच सलोनी आपणकर, उपसरपंच नितीन मालुसरे, ग्रामविकास अधिकारी दिलीप पाबरेक, ग्राम पंचायत सदस्य मोरेश्वर गायकर, पंचायत समितीचे झुंजेगर, मोरेश्वर गायकर, नरेंद्र पाटील, सविता एस पाटील, कलावती ढुमणे,अवधूत मातेरे, बबन वारगुडे,रुपेश पाटील,देवजी गायकर अंगणवाडी सेविका नयना टिकोणे,ग्राम पंचायत कर्मचारी रुपेश काळे,देवाजी गायकर,आदी उपस्थित होते.
तर स्वच्छता मोहिम राबवून संपूर्ण गावे,परिसर व सार्वजनिक ठिकाणे इथली स्वच्छता करून कच-याची विल्हेवाट लावण्यात आली. रहिवासी नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.