Press "Enter" to skip to content

शिरसे ठरली कर्जत तालूक्यातील “स्मार्ट” ग्रामपंचायत


सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔶🔷🔶


ग्रामपंचायत चा कारभार पारदर्शी, लोकाभीमुख, विकासाभीमूख व ग्रामस्थांच्या सहकार्याचा असावा या साठी ग्रामविकास मंत्रालया कडून विवीध योजना राबवल्या जात आहेत.या योजने अतंर्गत च तालूका व जिल्हास्तरावर स्मार्ट ग्रामपंचायत स्पर्धा घेण्यात येतात या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सहभागी झालेल्या ग्रामपंचायती मध्ये एकूण आकरा ग्रामपंचायती विजयी ठरल्या आहेत. या विजयी ग्रामपंचायत मध्ये कर्जत तालूक्यातील शिरसे एकमेव ग्रामपंचायत विजयी ठरली आहे.

100 गुणापैकी 80 गूण मीळवत शिरसे ग्रामपंचायत 2018-19 तालूक्यातील एकमेव स्मार्ट ग्रामपंचायत ठरली आहे.राज्यशासना तर्फे या स्पर्धेत विजयी ठरलेल्या ग्रामपंयातीना 50 लाख रूपयाचे बक्षीस देण्यात येते.व्यवस्थापन, दाईत्व, पारंपरिक उर्जा, पर्यावरण विषयी कार्य, प्रशासकीय पारदर्शकता या मूद्याच्या आधारे घेतलेल्या स्पर्धेत शिरसे ग्रामपंचायत अव्वल ठरली आहे.

स्मार्ट ग्रामपंचायत स्पर्धेत माझी ग्रामपंचायत अव्वल ठरल्याचे समाधान असुन माजी संरपच व शिवसेना नेते संतोष भोईर याचे मार्गदर्शनासह उपसरपच, सदस्य व प्रशासकीय आधिकारी यांच्या मध्ये समन्वय साधत ग्रामपंचायत मध्ये विवीध विकास कामे राबवली जात आहेत, महिलांचे आरोग्याचे प्रश्न, आदिवासी वाड्याचा विकास विशेषतः आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी विशेष उपक्रम राबणार आहे.

आरती संदिप भोईर-सरपंच (शिरसे ग्रामपंचायत)

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.