Press "Enter" to skip to content

किसान युवा क्रांती संघटनेच्या रोहा तालुका अध्यक्षपदी रोशन पाटील

सिटी बेल लाइव्ह । रोहा । प्रतिनिधी । 🔷🔶🔷


शेतकऱ्यांच्या न्याय, हक्कासाठी किसान युवा क्रांती संघटना शेतकऱ्यांच्या लढाऊ संघटनेची घोषणा केली असून किसान युवा क्रांती संघटनेच्या रोहा तालुका अध्यक्षपदी रोशन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रोशन पाटील हे युवा प्रबोधनकार सामाजिक कार्यकर्ते असून आता पर्यत त्यांनी अनेक शेतकरी आंदोलनात सहभागी होऊन शेतकरी बांधवाना प्रामाणिकपणे न्याय मिळवून दिला आहे. एस. इ. झेड. विरोधी आंदोलन, नेवाली शेतकरी आंदोलन, आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांच्या लढ्यात सहभाग, पेन येथे निर्माण होणाऱ्या बाळ गंगा धरणातल्या प्रकल्पग्रस्त बांधवांसाठी मार्गदर्शन, रिफायनरी विरोधी आंदोलनात स्वताचे जीव धोक्यात घालून लढत आहेत. गेली ११ वर्ष विद्यार्थी दिशेपासून युवकांच्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करत आहेत. शेतकऱ्यांना बद्दल असलेले आदर ,प्रेम हे नेहमीच त्यांच्या कार्यातून दिसून आलं आहे. म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेऊन किसान युवा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत गोसावी यांनी रोहा तालुका अध्यक्षपदी रोशन पाटील यांची नियुक्ती केली आहे.

यशवंत गोसावी यांनी दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पूर्ण करेल व शेतकरी बांधवाना न्याय मिळवून
देण्यासाठी किसान युवा क्रांती संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करेन, व संपूर्ण रायगड व रोहा तालुक्यातील प्रत्येक गावात संघटनेच्या माध्यमातून युवा कार्यकर्ते तयार करून संघर्ष उभा केला जाईल व प्रकल्पग्रस्त बांधवाना न्याय मिळवून दिला जाईल असे रोशन पाटील यांनी बोलतांना सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.