Press "Enter" to skip to content

द्रोणागिरी बाझार तर्फे 11 ऑक्टोंबर ला रक्तदान शिबिराचे आयोजन

जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होण्याचे आवाहन 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे । 🔷🔶🔷

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.त्यामुळे रक्ताची गरज ओळखून, गोरगरिबांना वेळेत रक्तपुरवठा व्हावा, रुग्णांचे जीव वाचावेत या हेतूने सामाजिक बांधिलकी जपत उरण तालुका ग्राहक सहकारी संस्था (मर्यादित )द्रोणागिरी बाझार, नागाव रोड, उरण तर्फे रविवार दि 11/10/2020 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

एन एम एम सी रक्तपेढी वाशी नवी मुंबई यांच्या सहकार्याने द्रोणागिरी बाझार नागाव रोड, उरण यांच्या माध्यमातून द्रोणागिरी बाझार गानू सदन, पोलीस लाईन समोर, नागाव रोड, उरण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. तरी रक्तदानास पात्र असलेल्या रक्तदात्यांनी ह्या आपत्तीवर मात करण्यासाठी सोशल डिस्टंसिंग व संचारबंदीचे नियम पाळून सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवून मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन द्रोणागिरी बाझार तर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी तथा नाव नोंदणीसाठी
महेंद्र म्हात्रे -9969228509,
अशोक तांडेल -9969228095,
प्रकाश नाईक -9969226522,
जितेंद्र घरत -8828465471,
विश्वजित कांबळे -8291245857
यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.