Press "Enter" to skip to content

कुणबी समाज व लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानची संयुक्त बैठक

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । 🔶🔷🔶

लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानच्या पनवेल येथील कार्यालयात कुणबी समाज संस्था पनवेल आणि लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या संबंधित पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक संपन्न झाली.

सदर बैठक लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र चे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ.संजय अनुसया राजाराम सोनावणे यांचे अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली पार पडली. बैठकीस डाॅ. राजेश साखरे,अध्यक्ष कोअर कमिटी,सौ. संजीवनी शिर्के उपाध्यक्ष कोअर कमिटी, सचिन कांबळे सरचिटणीस कोअर कमिटी, संजय कदम राज्य सरचिटणीस, श्रीमती स्वाती कांबळे तसेच कुणबी समाज संस्था पनवेल चे अध्यक्ष रमेश फळसणकर , अनिल मोंडे सचिव, बबन मांडवकर, विवाह मंडळ अध्यक्ष, सौ. लिना रटाटे, महिला मंडळ अध्यक्ष विनय राऊत सदस्य हे पदाधिकारी उपस्थित होते.

सदर बैठकीमध्ये कुणबी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य, महिला सबलीकरण तसेच समाजासाठी कार्यालय इत्यादी प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सुरवातीला सभाध्यक्ष डाॅ.संजय अनुसया राजाराम सोनावणे यांनी सर्वांचे स्वागत करून संयुक्त बैठकीचा मनोदय व्यक्त केला.

कुणबी समाज अध्यक्ष रमेश फळसणकर यांनी कुणबी समाजाच्या प्रश्नांबाबत सविस्तर माहिती दिली. महिलांच्या प्रश्नांबाबत सौ.लिना रटाटे यांनी माहिती विषद केली. महिलांच्या प्रश्नांबाबत सौ. संजीवनी शिर्के यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. शैक्षणिक प्रश्नांबाबत बोलताना डॉ. राजेश साखरे यांनी सांगितले की, कुणबी समाजातील तरूणांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले जाईल आणि शैक्षणिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल.

संजय कदम यांनी सांगितले की, कुणबी समाज संस्था पनवेल तालुक्यातील समाज बांधवांपर्यत पोहचविण्यासाठी प्रसारमाध्यम आणि वृत्तपत्रातून आवश्यक ती प्रसिद्धी दिली जाईल. कुणबी समाज बांधवांच्या जागेसाठी निधी देणगी जमा करण्यासाठी मत व्यक्त करून त्याबाबत सहकार्य करू असे आश्वासन सचिन कांबळे यांनी दिले.

बैठकीमध्ये सर्व विषयावरील चर्चेत अनिल मोंडे, बबन मांडवकर, विनय राऊत यांनी सुध्दा भाग घेऊन आपली मते मांडली. डाॅ.संजय अनुसया राजाराम सोनावणे यांनी सर्व प्रश्नांबाबत मार्गदर्शन व सविस्तर चर्चा करून कुणबी समाज संस्था पनवेल यांचा जागेचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत वैयक्तिक आणि संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करून लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्यात पुढाकार घेतला जाईल असे आश्वासीत केले. तसेच कुणबी समाज संस्थेला कोणत्याही प्रश्नांबाबत लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र सर्वोतोपरी सहकार्य करेल. त्यांच्यासाठी प्रतिष्ठानचे व्यासपीठ सदैव उपलब्ध असेल असे सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.