शारजाह : दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या भल्यामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मोक्याच्यावेळी धक्के बसल्याने कोलकाता नाईट रायडर्सला अखेर १८ धावांनी पराभव पत्करावा लागला. नितिश राणाने ३५ चेंडूंत ५८ धावा केल्यानंतर इयॉन मॉर्गनने १८ चेंडूंत ४४ धावांचा तडाखा दिला. मात्र अखेर बाजी मारली ती दिल्लीकरांनी.
लहान मैदानाचा फायदा घेत दिल्लीने २२८ धावांचा एव्हरेस्ट उभारला. सलामीवीर शुभमान गिल (२८) फारशी चमक दाखवू शकला नाही. सुनील नरेनही अपयशी ठरला. राणाने दमदार अर्धशतक झळकावले, मात्र तरीही केकेआरला आवश्यक धावगती गाठता आली नाही.
मॉर्गन आणि राहुल त्रिपाठी यांनी सामना अवाक्यात आणलाही, परंतु मोक्याच्यावेळी दोघांना बाद करत दिल्लीने बाजी मारली. तत्पूर्वी,अय्यरच्या धमाकेदार नाबाद ८८ धावा आणि सलामीवीर पृथ्वी शॉ (६६), रिषभ पंत (३८) यांच्या जोरावर दिल्लीने वर्चस्व राखले. श्रेयसने ६ षटकारांची आतषबाजी करताना कोलकाताची गोलंदाजी फोडून काढली. रसेलचा अपवाद वगळता कोलकाताच्या सर्व गोलंदाजांची नऊहून अधिक धावगतीने पिटाई झाली.
सामन्यातील रेकॉर्ड
दिल्ली कॅपिटल्सने सातव्यांदा मारली द्विशतकी मजल.
यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्लीने उभारली सर्वोत्तम धावसंख्या.
पृथ्वी शॉचे सहावे आयपीएल अर्धशतक.
फलंदजांच्या कामगिरीनंतर हर्षल पटेलसह गोलंदाजांनी अचूक मारा करीत प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवले.
श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ व पंत यांनी उल्लेखनीय योगदान देत संघाला विशाल धावसंख्या उभारुन दिली.
अबुधाबी : विराट कोहलीला चौथ्या सामन्यात अखेर सूर गवसला. त्याने नाबाद ७२ धावांचा झंझावात करताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाला शनिवारी राजस्थान रॉयल्सवर आठ गड्यांनी सहज विजय मिळवून दिला. विराटने सात चौकार आणि दोन षटकार ठोकून सलामीवीर देवदत्त पडीक्कलसोबत दुसऱ्या गड्यासाठी ९९ धावांची भागीदारी केली.
पडीक्कलने यंदा तिसऱ्यांदा अर्धशतकी खेळी करीत ४५ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह ६३ धावांचे योगदान दिले. फिरकीपटू युजवेंद्र चहल याच्या भेदक माºयापुढे राजस्थान रॉयल्स संघ ६ बाद १५४ पर्यंत मजल गाठू शकला.
कोहलीच्या संघाने पाच चेंडू आधीच २ गड्यांच्या मोबदल्यात १५८ धावा करत सलग दुसरा विजय नोंदवला. चहलने २४ धावात ३ गडी बाद केले. पंजाबच्या मोहम्मद शमीसह तो गोलंदाजांमध्ये संयुक्त अव्वल स्थानावर आहे.
त्याआधी, मागच्या सामन्यात मुंबईला नमवणाºया राजस्थानला आरसीबीच्या गोलंदाजांपुढे मोकळीक मिळाली नाही. तथापि अष्टपैलू महिपाल लोमरोर याने ३९ चेंडूत तीन षटकार आणि एक चौकार मारला. त्याच्या ४७ धावांच्या बळावर राजस्थानने आव्हानात्मक मजल गाठली. स्टीव्ह स्मिथ ५, अॅरोन फिंच ८आणि जोस बटलर २२ हे लवकर बाद झाले. नाबाद २४ धावा करणारा राहुल तेवतिया आज पुन्हा मोठी फटकेबाजी करण्याच्या इराद्याने आला होता. नवदीप सैनीचा चेंडू छातीवर आदळल्यानंतरही त्याने अखेरच्या षटकात दोन षटकार खेचले, हे विशेष.
सामन्यातील रेकॉर्ड
चौथ्या सामन्यात तिसरे अर्धशतक नोंदवणारा देवदत्त पडीक्कल आयपीएलमध्ये पहिला खेळाडू ठरला. देवदत्तने पहिल्या सामन्यात ५४, दुसºया सामन्यात १ तिसºया सामन्यात ५४ आणि आज ६३ धावा केल्या.
टर्निंग पॉइंट
दोन फिरकीपटू युजवेंद्र चहल व वॉशिंग्टन सुंदर यांनी आपल्या ८ षटकांत केवळ ४४ धावा दिल्या. चहलने तीन बळी घेतले.
Be First to Comment