Press "Enter" to skip to content

उरण नगर परिषद कार्यालयात महात्मा गांधी जयंती साजरी


सिटी बेल लाइव्ह । रमेश थळी । उरण । 🔷🔶🔷

राज्यात २ ऑक्टोबर रोजी राष्ट्र पिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी होत असताना उरण नगर परिषदेच्या तर्फे नगर परिषद कार्यालयात उरण नगर परिषदेचे मुख्य अधिकारी संतोष माळी यांच्या उपस्थित महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमात मुख्य अधिकारी यांनी गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नम्रअभिवादन केले. या प्रसंगी या कार्यक्रमात नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे,नगर सेवक राजेश ठाकुर, कर्मचारी महेश लवटे,जगदीश म्हात्रे,आदि मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.