Press "Enter" to skip to content

सेवा सप्ताहानिमित्त नागोठणे लायन्स क्लब कडून डायबिटीस चेकअप कॅम्प

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔶🔷🔶

लायन्स क्लब ही जागतिक पातळीवर काम करणारी एक नंबरची सामाजिक संस्था आहे. अशा या सामाजिक संस्थेच्या वतीने विवीध प्रकारचे लोकाभिमुख असे सामाजिक उपक्रम वेळोवेळी राबविले जातात. याचबरोबर लायन्स क्लबच्या माध्यमातून आरोग्य , शिक्षण , अवेअरनेस कॅम्प असे अनेक शिबीरे संपुर्ण जगभर राबविण्यात येत असतात.यामधे दर वर्षी २ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत सेवा सप्ताहाचे आयोजन जगभरातील सर्व लायन्स क्लब करित असतात.

याचाच भाग म्हणून रोहा तालुक्यातील नागोठणे येथील लायन्स क्लबच्या माध्यमातून शुक्रवार दि २ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी या सेवा सप्ताहाचे उदघाटन स्वच्छता अभियान राबवून लायन्स क्लबचे चार्टड प्रेसिडेंट लायन प्रकाश जैन यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी नागोठणे शांतीनगर भागातील स्व.बाळासाहेब ठाकरे उद्यानाची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली.उद्यानातील पावसामुळे वाढलेले गवतही यावेळी काढण्यात आले.यासाठी नागोठणे लायन्स क्लबचे लायन यशवंत चित्रे यांनी खुप मेहनत घेतली.तसेच यासाठी नागोठणे ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ.मिलींद धात्रक यांनी बहुमूल्य सहकार्य केले.

याच बरोबर सेवा सप्ताहाच्या निमित्ताने दुपारी ३ ते सायं ५ या दरम्यान लायन्स क्लबच्या वतीने नागोठणे येथील लायन्स हेल्थ सेंटर येथे मोफत डायबीटीस चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी नागोठण्यातील श्रीकृष्ण पॅथॉलॉजीचे डॉ.अनिल गिते व त्यांच्या टिमचे अनमोल सहकार्य मिळाले. यावेळी या कम्पमध्ये ३५ लोकांनी डायबीटीस चेकअप केले.तसेच कोराना काळातही आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या नागोठणे पोलीसांची देखील या कॅम्पच्या निमित्ताने डायबीटिस चेकअप करण्यात आले.यावेळी नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे व त्यांचे उपस्थित सर्व सहकारी यांचे चेकअप करण्यात आले.

यावेळी नागोठणे लायन्स क्लबचे प्रेसिडेंट लायन संदिप नायर , चार्टर प्रेसिडेंट लायन प्रकाश जैन , डिस्ट्रीक्ट चेअरमन एमजेएफ लायन सुधाकर जवके, अॅक्टीव्हीटी चेअरमन लायन यशवंत चित्रे , पास्ट प्रेसिडेंट लायन सुजाता जवके , सेक्रेटरी एमजेएफ लायन विवेक सुभेकर, लायन विवेक करडे , लायन अनिल गीते आदी लायन्स क्लबचे सदस्य उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.