Press "Enter" to skip to content

छगन भुजबळ, समीर भुजबळ वाढदिवसानिमित्त होम क्वारंटाईन सुविधा


सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔷🔶🔷

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग मंञी छगन भुजबळ तसेच नाशिक लोकसभा मतदार संघाचे खासदार समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १ ऑक्‍टोबर ते १५ ऑक्टोबर २०२० या कालावधीमध्ये कोरोना बाधित रुग्णांसाठी होम क्वारंटाईन सुविधा मोफत केली जाणार आहे.

रोहा तालुक्यातील धाटाव येथील डॉक्टर राजू जाधव आणि डॉक्टर विद्या जाधव यांच्यामार्फत या सुविधा मोफत केल्या जाणार आहे. संबंधांनी स्वराज क्लिनिक धाटाव डॉ. राजू जाधव. मोबाईल नंबर ९९२१७४१९६०तसेच विरोज क्लिनिक रोहा. डॉक्टर विद्या जाधव. मोबाइल ९९२१७४१९६१ येथे संपर्क साधावा.

डॉक्टर राजू जाधव हे अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक कार्यात अग्रेसर आहेत. कोरोना ने अनेकांना मोठा धक्का दिला. अनेकांकडे औषधोपचारासाठी आर्थिक बळ नाही. या गोष्टीची जाणीव डॉक्टर राजू जाधव आणि डॉक्टर विद्या जाधव यांनी ठेवून छगन भुजबळ तसेच खासदार समीर भुजबळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना बाधित रुग्णांसाठी दिनांक १ ऑक्‍टोबर ते १५ ऑक्टोबर २०२० या कालावधीसाठी मोफत होम क्वारंटाईन सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे डॉक्टर राजू जाधव यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.