Press "Enter" to skip to content

केअर ऑफ नेचर संस्थेच्या तर्फे मोफत मास्क व सॅनिटीझर वाटप

सिटी बेल लाइव्ह । प्रतिनिधी ।आवरे । 🔷🔶🔷

सामाजिक काम असेल , समाज कार्य असेल ते सतत करत चला माणसाशी नात जोडणारे कार्य करा माणूसकी जिवंत असे पर्यंत समाजकार्याची चर्चा होईल या विचारसरणी ने चालणारी संस्था केअर नेचर.

सर्वात कठीण काळ म्हणजे कोरोना चे संपुर्ण जगावर आलेलं संकट हा रोग किती महाभयंकर आहे याची प्रचिती सर्वाना आली परंतु त्या पेक्षा अधिक म्हणजे प्राथमिक सुरक्षित असे उपाय कोरोना शी लढताना प्रतिबंध असे सुरक्षित उपाय केलं तर निश्चितच त्याचा फायदा सर्व सामान्य नागरिकांना प्रत्यक्षात होईल या साठी कोरोना कालावधीत प्रत्यक्षात ग्राउंड फिल्ड वर जाणारी संस्था म्हणजे केअर ऑफ नेचर संस्था होय.

कुठलं ही कार्य असेल मोफत अन्नदान , मोफत सायकल वाटप असेल तसेच मोफत मोफत सॅनिटाइझर असेल आरोग्यासाठी सुविधा असणारी संस्था म्हणजे केअर ऑफ नेचर होय केअर ऑफ नेचर संस्थेचे आधार स्तंभ संस्थापक राजू मुंबईकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सॅनिटीझर बॉटल गरजू ना वाटप करण्यात आलं.

अगदी ग्राउंड लेव्हल ला जाऊन सारडे विकास मंच चे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे व सुयश क्लासेस चे अध्यक्ष निवास गावंड यांनी सहभाग दर्शविला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.