Press "Enter" to skip to content

परतीच्या पावसाने खोपोली नगरपरिषदेची पोलखोल : डिसी नगर तुंबले

सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । 🔷🔶🔷

शनिवारी परतीच्या पावसाने खोपोली नगरपरिषदेच्या कामाचा पंचनामा केला असून शिळफाटा ङिसी नगर भागात गटाराची अर्धवट कामामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले.शिवाय दुचाकि देखील दोन फूट पाण्यामुळे बंद पङल्या.

नगरपरिषद हद्दीत शिळफाटा येथे ङिसी नगर,सह्याद्री विद्यालयाकङे जाणा-या रस्त्याच रूंदिकरण आणि नवीन पक्की गटार बांधण्याच काम मे महिन्यात सुरू झाल होत.रस्ता रूंदिकरणाला स्थानिक नागरिकानी सहकार्य करित स्वतःच्या हद्दीतील संरक्षक भिंत देखील पाङून काहि फूट जागा उपलब्ध करून दिली.कामाला सुरवात झाली.परंतु लाॅकङाऊन आणि पावसाळा यामुळे काम रङतखङत सुरू होते.काम झाल्यानंतर पाणी निचरा व्यवस्थित होईल हि अपेक्षा फोल ठरली आहे.

चार महिने नागरिकानी कसरत करत दिवस लोटले.परंतु ऑक्टोंबर उजाङला तरि अपूर्ण काम आणि ञुटी दूर करण्यात आलेल्या नाहित.त्याचाच फटका शनिवारी परतीच्या पावसात पुन्हा अनुभवयला मिळाला.

अर्धा तास मुसळधार पङलेल्या पावसात रस्त्यावर दोन फूट पाणी साचले.तर काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले.दुचाकि देखील बंद पङल्याने अनेकांचे हाल झाले.पाण्यातून वाट काढत एकमेकाना मदत करित दुचाकि बाहेर काढल्या. नागरिकाना होत असलेल्या ञासाबद्दल ठेकेदारावर कारवाईची मागणी याभागातील रहिवाशी करित आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.