Press "Enter" to skip to content

सी ई टी पी ते फूड लँड रस्ता झाला चकाचक

टी आय ए च्या पुढाकाराने झाले कॉंक्रीटीकरण 🔷🔶🔷

आमदार प्रशांत ठाकूर यांचे लाभले सहकार्य 🔶🔷🔶

सिटी बेल लाईव्ह । तळोजा । 🔶🔶🔷🔷

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील एक अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा रस्ता वाहतुकीसाठी चकाचक झाला आहे. तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन च्या पुढाकाराने या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. नावडे फाटा येथील वाहतुकीचा ताण हलका करण्यासाठी हा रस्ता अत्यंत महत्वाचा समजला जातो. परंतु अवघड वाहनांच्या रहदारीमुळे हा रस्ता अक्षरशः खड्ड्यात गेला होता.
याबाबत अधिक माहिती देण्यासाठी टी आय ए चे अध्यक्ष सतीश अण्णा शेट्टी यांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.

यामध्ये ते म्हणतात की, सीईटीपी ते
फूड लँड  या रस्त्याची लांबी साधारणपणे सव्वा किलोमीटर असून, अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे त्याची वाताहत झाली होती. या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी सिमेंटच्या रस्त्यांचे विशेष पैलू आणि फायदे उलगडून दाखवले आहेत.त्यामुळेच हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा बनवला पाहिजे अशी भूमिका सर्वप्रथम तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन घेतली होती. याच भूमिकेतून त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत सर्वतोपरी सहाय्य करण्याचे वचन दिले.
या रस्त्याचे काम जवळपास पूर्णत्वाकडे जात असून सव्वा किलोमीटर लांबीचा सिमेंट काँक्रिट चा हा रस्ता वाहतूकदार, कर्मचारी ,व्यावसायिक व कारखानदार यांच्यासाठी वरदान ठरणार आहे.

कळंबोली येथील पोलाद व लोखंड बाजारातील अवजड वाहनांना तळोजा औद्योगिक वसाहतीत पोचण्यासाठी हा रस्ता सोयीचा आहे. या रस्त्यावर होणाऱ्या रहदारीचे प्रमाण बघता दीर्घकालीन टिकेल असा सिमेंट कॉंक्रिटचा रस्ता बनवणे ही खरोखर काळाची गरज होती. त्या गरजेनुरूप टी आय ए ने कठोर परिश्रम करत, सातत्यपूर्ण पाठिंबा करत हे काम मार्गी लावल्याने त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव होत आहे.

या रस्ते बांधणीचे काम सिडको च्या माध्यमातून होत असून पी पी खारपटील कन्स्ट्रक्शन कंपनीला या कामासाठी ठेका मिळाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मार्च 2021 अंती हे काम पूर्ण होणार असल्याचे समजते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.