Press "Enter" to skip to content

शेतकऱ्यांनी महानगर गॅसचे काम रोखले : तहसीलदारांना निवेदन


सिटी बेल लाइव्ह । खालापूर । विकी भालेराव । 🔷🔶🔷

खोपोली कर्जत हाळफाटा मार्गे १४ किमी अंतराच्या मार्गावर रस्त्या लगत महानगर गॅस कंपनीची पाईपलाईन टाकण्यात काम सुरू आहे.  रस्त्याच्या बाजूला खोदकाम सुरू असून, दिवस रात्री कुठलीही दक्षता न घेता पाईप जोडणीसाठी लागणारे जेसीबी मशीन, हायड्रा तसेच वेल्डिंग करण्याचे साहित्य मार्गामध्येच ठेवले जात असल्याने वाहनचालकांना याचा फटका बसत आहे. ना बॅरिकेट्स ना सूचना फलक लावण्यात आले ना झेंडे दाखवणारा माणूस उभा केला ना सेफ्टी ऑफिसर ना सुपरवायझर ना वाहतूक नियमन करण्यासाठी व्यवस्था. या मार्गावर कधीही ही अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे संबंधित ठेकेदार आपल्या बाहुबली वजनाचा फायदा घेत काम रेटून नेत आहे शेतकऱ्यांना जमीनीचा मोबदला न देता काम सुरू असताना मात्र महानगर गॅस कंपनीला त्याचे काहीच सोयरसुतक नाही.
     

आमच्या कडे सर्व ना हरकत दाखले असल्याचे सांगून बिनधास्तपणे खोदकाम व पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत या पाईपलाईनचे काम करण्यात येऊ नये काम करण्याचा यो जोपर्यंत जमीन हस्तांतरीत होत नाही तोपर्यंत त्याच्यामुळे शेतकऱ्याची मालकी असते असे नावंढे स्थानिक शेतकरी किरण काशिनाथ हडप यांचे म्हणणे आहे

महानगर गॅस पाईपलाईन कर्जत खालापूर खोपोली मधून जात आहे तरी ती रस्त्यालगत जात असून यामध्ये ठेकेदार व संबंधित अधिकारी शेतकऱ्यांना विचारात न घेता बळाचा वापर करून काम रेटून नेत आहे मात्र शेतकरी कदापी हे सहन करुन देणार नाही जोपर्यंत आम्हाला आमच्या शेतीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत पाईपलाईन नाही असा निर्धार बाधीत शेतकऱ्यांनी केला आहे 

दरम्यान खोपोली कर्जत मार्गाच्या पाईपलाईन बाधित होणारे १७ शेतकऱ्यांनी खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार यांना बाधीत शेतीची भरपाई मिळत नाही तोपर्यंत महानगर गॅस च्या कामास मंजुरी देऊ नये असे लेखी निवेदन दिले आहे

 कर्जत खोपोली पळसदरी मार्ग सन १९७३ मधे मंजूर झाला असून तत्कालीन सार्वजनिक बांधकाम खात्याने शेतकऱ्यांना विचारात न घेता कुठल्याही सही न घेता जमीनी संपादन करून जागा ताब्यात घेतल्या.  योग्य मोबदला मिळाला नाही असे भिजते घोंगडे असताना.पुन्हा एकदा या रस्ता लगत महानगर गॅसचे काम सुरू आहे.  जागेचा कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम करु देणार नसल्याचे तहसिलदारांना लेखी निवेदन देण्यासाठी बाधित शेतकरी मच्छिंद्र पुंडलिका आगिवले, किरण काशिनाथ हाडप, हरिश्चंद्र कोंडू हडप रामभाऊ हडप बाळाराम पांडुरंग हडप रामदास गोपाळ हडप गणेश शंकर हाडप मारुती धर्मा हडप व शेतकरी उपस्थित होते.

या बाबत रस्ते विकास महामंडळाचे अभियंता किस्ते यांनी सांगितले की हा रस्ता भारत सरकारकडे वर्ग करण्यात आला असून एमएसआरडीसीने शेतकऱ्यांचे पैसे शासनाकडे जमा केले आहेत शेतकऱ्यांना बाधित झालेल्या जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून आम्हीही प्रयत्नशील असून संबंधित खात्याकडे याचा पाठपुरावा करीत आहोत तर महानगर चे तिडके यांनी सांगितले की शेतकरी व रस्ते विकास महामंडळ यांनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा आम्हाला महानगर गॅस साठी परवानगी एम एस आर टी सी म्हणजेच महा रस्ते विकास महामंडळाने दिले असल्याचे सांगितले तर बाधित शेतकरी बाळाराम किरण हडप मच्छिंद्र अगिवले रामाला मोबदला मिळत नाहीत तोपर्यंत रस्त्याच्या बाजूच्या खोदकाम व गॅस पाईपलाईनचे काम करू देणार नाही अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे या मार्गाच्या लाईने १७ शेतकरी बाधित झाले असून १९७३ पासून या मार्गात या शेतीचे भूसंपादन करीत असतात झाल्याने त्याचा मोबदला मिळावा म्हणून शासन दरबारी पाठपुरावा करीत असून अध्यायाचा मोबदला मिळाला नसल्याने शेतकरी नाराज आहेत तर वेळोवेळी आंदोलने निदर्शने करूनही एक पिढी गेली अद्याप आम्हाला न्याय मिळाला नसल्याची खंत व्यक्त करीत आहे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.