ग्रामीण रूग्णालयाच्या हस्तांतरण कार्यक्रमात डावलल्याने रुसवे फुगवे 🔷🔶🔷
ग्रामीण रुग्णालय व्हावं हे राष्ट्रवादीच स्वप्न – गीताताई पालरेजा, महिला जिल्हाध्यक्षा राष्ट्रवादी 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । रोहा । समिर बामुगडे । 🔶🔶🔷🔷
सुधागड तालुक्याचे मुख्य ठिकाण असणाऱ्या पाली येथील बहूप्रतीक्षेत असणाऱ्या आणि शासनाची मंजुरी येऊनही तांत्रिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न विद्यमान पालकमंत्री आदीतीताई तटकरे यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या साहाय्याने सोडवला असून या ग्रामीण रुग्णालयाच्या उभारणीला वेग आला असून बुधवारी या रुग्णालयासाठी आवश्यक असणाऱ्या सव्वा दोन एकर जागेचे हस्तांतरण जिल्हा परिषदेकडून महाराष्ट्र शासनाकडे करण्यात आले.
यावेळी या जागेच्या हस्तांतरण कार्यक्रमाला या रुग्णालयासाठी स्वातंत्रदिनी धरणे आंदोलन करणारे सत्यशोधक वारकरी महासंघाचे अध्यक्ष महेश पोंगडे महाराज, तहसीलदार दिलीप रायन्नावर, आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाणे उपसंचालक डॉ. गौरी राठोड, जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, रवींद्र देशमुख, पंचायत समिती सभापती रमेश सुतार, राजेश मपारा, राजेंद्र राऊत आणि विविध पक्षाचे कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते.
परंतू या नियोजित कार्यक्रमाचे निमंत्रण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिले नसून आपल्याला या कार्यक्रमातून जाणीवपूर्वक डावलले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हा अध्यक्षा गीताताई पालरेचा यांनी केला असून या कार्यक्रमाचे नियोजन करणाऱ्या प्रशासनाचा निषेध केला आहे.








Be First to Comment