Press "Enter" to skip to content

चिनी वस्तू टाळा अभियानाला सुरुवात.

चिनी वस्तू टाळा अभियानाला सुरुवात.

श्रीनिवास काजरेकर
पनवेल दि.: ०३,
भारत विकास परिषद पनवेल शाखेतर्फे 2 ऑक्टोबर अर्थात म. गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त नविन उपक्रम हाती घेण्यात आला आहे .
चीनी बनावटीच्या वस्तू दुकानदारांनी स्वतःच्या दुकानात विक्रीसाठी ठेवू नये आणि या पुढे आम्ही फक्त भारतीय उत्पादन विक्री करावी या हेतूने एक अभियान हाती घेण्यात आले आहे. याअंतर्गत पनवेल परिसरातील दुकानदारांना चिनी वस्तू विक्रीसाठी न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
आम्ही भारत मातेची संताने आहोत व आम्ही चिनी बनावटीच्या वस्तू विकत नाही असा आशय असलेली भित्तीपत्रके पनवेल शहरातील विविध भागातील दुकानांमधे परिषदेतर्फे प्रत्यक्ष भेटून लावण्यात आली.
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभियानात सहभाग घेवून या उपक्रमाची प्रशंसा केली. या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष गिरीश समुद्र, सचिव कमांडर दिपक जाम्बेकर, खजिनदार नितिन कानिटकर यांच्यासह संस्थेच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पनवेल परिसरातील व्यापारी व दुकानदारांनीही उत्तम प्रतिसाद दिला.
हे अभियान पनवेल शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठा आणि जास्तीत जास्त दुकानदार यांचेपर्यन्त पोहोचेपर्यन्त सुरु राहणार आहे. तसेच चिनी वस्तूंऐवजी भारतीय वस्तू खरेदी करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.