Press "Enter" to skip to content

तटकरे “त्रिमूर्ती” उद्या अवतरणार नागोठण्यात

नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनच्या वर्धापनदिनानिमित्त खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे उद्या नागोठण्यात 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 💠🌟💠

नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचा नववा वर्धापन दिन उद्या शनिवार दि. ३ आॅक्टोबरला सायंकाळी ६.०० वाजता नागोठणे बाजारपेठेतील आराधना भवन हाॅल, येथे संपन्न होत आहे.

रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली व त्यांच्याच हस्ते होणा-या या कार्यक्रमासाठी राज्यमंत्री व रायगडच्या पालक मंत्री ना.कु. आदितीताई तटकरे व विधानपरिषदेचे आमदार अनिकेतभाई तटकरे हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी आज उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे व ना. आदितीताई तटकरे यांच्या हस्ते पत्रकारांना पुरस्काराचे वितरण करुन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या नागोठणे विभागातील व्यक्तींचा सत्कारही संघटनेतर्फे मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करुन होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने रायगडच्या पालक मंत्री झाल्यानंतर ना. आदितीताई तटकरे प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमासाठी नागोठण्यात येत असल्याने नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएनचे संस्थापक कार्याध्यक्ष शामकांत नेरपगार व अध्यक्ष अॅड. महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात संघटनेकडून करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.