खांब देवकान्हे मार्गावरील काटेरी झुडपे काढण्याचे काम सुरु 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔷🔶🔷
मुंबई गोवा महामार्गालगत जोड़ला गेलेला उप रस्ता म्हणजे खांब देवकान्हे पालदाड तसेच हा मार्ग अनेक गावांना जोड़ला गेला असून या मार्गावरुन सातत्याने वहानांची वर्दल तसेच रहदारिचा मार्ग म्हणून सर्वांनाच सुप्रसिद्धआहे या मार्गावर अनेक मोठ मोठे जिव घेणे वळणे व काटेरी झुडपे खूप मोठ्या प्रमाणावर वाढले असून मार्ग धोकादायक बनला असल्याने येथील नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. या अनुषंगाने येथील नागरिकांनी सिटी बेल लाइव्ह च्या माध्यमातून रस्ता मार्गाच्या कडेला वाढलेली काटेरी झुडपे काढण्यात यावी अशी मागणी केली होती आणि त्याचा पाठपुरावा म्हणून संबधित खाते स्थानिक लोकप्रतिनिधी माध्यमातून संबधित ही काटेरी झुडपे काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने संबधित नागरिक सिटी बेल लाइव्ह चे आभार व्यक्त करीत आहेत.
जोरदार झालेल्या पावसामुळे खांब देवकान्हे पालदाड मार्गावर खूप मोठया प्रमाणावर काटेरी झाडे झुडपे वाढल्याने या मार्गावरून ये जा करणाऱ्या प्रवाश्यांना व नागरिकांना खूप धोकादायक ठरत असे वाहन चालकांना तर अक्षरशः समोरीर येत असलेली वाहन दिसत नसल्याने अधिक आपघातांचा प्रमाण वाढले होते याची दखल संबधित अधिकारी वर्ग व ग्रामीण लोकप्रतिनिधी यांनी घ्यावी आणि भरमसाठ वाढलेली काटेरी झुडपं ताबतोब काढण्यात यावी अशी मागणी सिटी बेल लाइव्ह च्या बातमीद्वारे केली. याची ताबडतोब दखल घेत या मार्गावरीक काटेरी झुडपे काढण्याचे काम सुरू केले असल्याने सर्व प्रवाशी वर्गांकडून व नागरिकांकडून सिटी बेल लाइव्ह चे आभार मानले जात आहे.








Be First to Comment