सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔷🔶🔷
रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्युनिअर कॉलेज, जासई येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती सोशल डीस्टंटस व मास्कचा वापर करून साजरी करण्यात आली.
भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष , कामगार नेते व शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या शुभ हस्ते महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
या प्रसंगी त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की,सत्य,अहिंसा, सत्याग्रह या मार्गाने लढा उभारून आपणास भारतीय स्वातंत्र आणि लोकशाही प्राप्त करून दिली, त्यांच्या या त्यागाची महती त्यांनी सांगितली.
तसेच रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर व विद्यालयाचे मुख्याध्यापक अरूण घाग यांनी लालबहादूर शास्त्रींच्या प्रतिमेची पूजा करून या महापुरुषांच्या जीवन चरित्राची ओळख करून दिली. तसेच या कार्यक्रम प्रसंगी बेटी बाचाओ – बेटी पाढाओ हा संदेश दिला गेला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नुरा शेख सर यांनी केले. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते जितू पाटील आणि विद्यालयातील सेवक उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. सुहास शिंदे यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.








Be First to Comment