Press "Enter" to skip to content

महात्मा गांधी जयंती निमित्त पिगोंडे ग्रामपंचायतीने राबविले स्वच्छता अभियान

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔶🔷🔶

नागोठण्याजवळील पिगोंडे (ता. रोहा) ग्रामपंचायतीकडून ग्रामपंचायत हद्दीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्याच्या उद्देशाने तसेच आपल्या ग्रामपंचायत हद्दीतील संपूर्ण परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सरपंच संतोष कोळी व सर्व सदस्य यांच्या संकल्पनेतून एक दिवसीय स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

याचबरोबर यावेळी सरपंच संतोष कोळी यांच्यासह उपस्थित असणाऱ्या सर्व सदस्य व कर्मचारी यांनी आपले गाव व परिसर स्वच्छ ठेवण्या संबंधीची शपथ घेऊन प्रार्थना करण्यात आली.

यावेळी सरपंच संतोष कोळी यांच्यासह उपसरपंच सखाराम घासे ग्रामपंचायत सदस्य नाना बडे, धनाजी पारंगे, शैलेश शेलार, कांचन माळी, रंजना माळी, कुसुम बावकर, विजय अहिरे, गोरखनाथ पारंगे, अंकुश ताडकर, प्रकाश बडे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान यावेळी या स्वच्छता अभियान राबवित असताना सरपंच संतोष कोळी यांनी उपस्थितांना सत्य, अहिंसा, समानता, न्याय या तत्वांच्या माध्यमातून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी मार्गदर्शन करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच ‘जय जवान जय किसान’ या घोषणेने देशाच्या इतिहासात कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याबद्दल उपस्थितांना माहिती देताना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. तसेच ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवित असताना स्वच्छतेबरोबरच आपण आपला गाव हागणदारीमुक्त कसे राहील याकडे जास्तीत जास्त लक्ष देणे गरजेचे आहे असेही संतोष कोळी यांनी यावेळी सांगितले.

याचबरोबर या अनुषंगाने नागरिकांनी स्वच्छता राखणे, आपला परिसर स्वच्छ ठेवणे यात सातत्य ठेवल्यास यामुळे ग्रामपंचायत रोगराई मुक्त होईल असे मतही कोळी यांनी व्यक्त केले.

पिगोंडे ग्रामपंचायतीकडून राबविण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या ग्रा.पं.सदस्य, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ या सर्वांचे सरपंच संतोष कोळी यांनी यावेळी आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.