Press "Enter" to skip to content

मनसे जिल्हा सचिव लताताई कळंबे यांच्याकडून प्रशासकीय अधिकार्यांना भेट

सुधागड प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व आकर्षक किचैन पाकीटची भेट 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । पाली । रायगड ।धम्मशील सावंत । 🔶🔷🔶

अखिल मानव जातीवर कोरोना विषाणू संसर्गाचे मोठे संकट आले आहे. या जागतीक साथरोगाच्या आणीबाणीच्या स्थितीतही प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्ये प्रामाणिकपणे व चोख बजावताना दिसत आहेत.  कोव्हिडं योध्याच्या भूमिकेत खंबीरपणे या संकटाचा मुकाबला करीत स्वतःचा जीव धोक्यात घालून  संसर्ग रोखण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या प्रशासनातील  सर्व योध्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत मनसेच्या महिला रायगड जिल्हा सचिव तथा सामाजिक कार्यकर्त्या लताताई कळंबे यांनी स्वतः पुढाकार घेत स्वखर्चाने सुधागड तालुका प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सॅनिटायझर व आकर्षक किचैन पाकीट भेट दिले.

जनतेच्या हित व संरक्षणासाठी  प्रशासन अविरतपणे काम करीत आहे, या कार्यात प्रशासनातील प्रत्येक घटकांचा अपूर्व सहभाग व सेवाकार्य प्रेरणादायी आहे. त्यांना यापुढे देखील अधिक प्रभावीपणे  काम करण्यासाठी पाठिंबा व प्रोत्साहन मिळावे,तसेच  त्यांचे मनोबल वाढावे या उद्देशाने लताताई कळंबे यांनी महसूल, वनविभाग व पोलीस प्रशासनातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांची  भेट घेऊन विचारपूस केली. व कोरोना काळात अत्यावश्यक असणाऱ्या रोगप्रतिबंधात्मक सॅनिटायझर बॉटल देऊन स्वतःचे आरोग्य सांभाळून इतरांच्या आरोग्यासाठी लढायचे आहे, असे सांगत सर्वाना आरोग्याची काळजी घेण्याचे कळकळीने आवाहन केले.

सुधागड प्रशासनातील कृषी विभाग, विजवीतरण विभाग व अन्य शासकीय कार्यालयात पोहचून प्रत्येक अधिकारी , कर्मचाऱ्यांना देखील सॅनिटायझर चे वाटप करणार असल्याचे कळंबे यांनी यावेळी सांगितले. सुधागड तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण  काम पोलीस प्रशासन करत आहे. शासनाच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी दिवसरात्र  पोलिस कार्यरत आहेत. अशा  पोलीस बांधवांचा  देखील आम्हाला सार्थ  अभिमान असल्याचे  श्रीमती कळंबे यांनी स्पष्ट केले. लताताई कळंबे  यांनी सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या सेवाभावी कार्याचे पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार, पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, सुधागड पाली वनक्षेत्रपाल समीर शिंदे आदींनी कौतुक करीत प्रशासनाच्या वतीने आभार मानले. यावेळी मनसे जिल्हा सचिव लताताई कळंबे, मनसे सैनिक सचिन झुंजारराव, रवींद्र कदम, अजय अधिकारी, भावेश बेलोसे, राजू शेख, कल्पेश धावडे आदिंसह मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.