सिटी बेल लाइव्ह । पेण । राजेश कांबळे ।
उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील पिडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेलेले काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना युपी पोलिसांनी अटक केल्याने या घटनेचा पेण काँग्रेस कमिटीकडून जाहीर निषेध करण्यात आला असून यावेळी पीडितेला वेळेवर उपचार मिळाला नाही तसेच यूपी सरकारने पीडित मुलीला न्याय दिलेला नाही यामुळे यूपी सरकारचा तसेच भाजप सरकारचा पेण काॅग्रेस पक्षातर्फे जाहीर निषेध करण्यात आला.
या पीडित मुलीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना पोलिसांकडून अटक करण्यात येते हे सरकारला न शोभनारे असल्याने या घटनेचा पेण काँग्रेस कमिटी कडून जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे काँग्रेसच्या प्रदेश सदस्या नंदा म्हात्रे यांनी सांगितले तसेच यावेळी पेण शहरात युपी सरकारचा निषेध करुन नगरपालिका ते महात्मा गांधी मंदिरा पर्यंत मेणबत्ती प्रज्वलित करुन पिडीतेला श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी नंदा म्हात्रे, अशोक मोकल, परशुराम म्हात्रे, निलेश म्हात्रे, हिंदु कुवारे, प्रकाश मोकल, प्रविण पाटील, राजा म्हात्रे आदिंसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment