Press "Enter" to skip to content

“मंदिरांचे दार उघडा” आखिल गुरव समाज संघटनेची मागणी

रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना गुरव समाजाचे निवेदन 🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । 🔷🔶🔷

गेल्या सात महिन्यापासून बंद असलेली मंदिरामुळे उपजिविकेचा प्रश्न निर्माण झालेला गुरव समाजानी मदतीसाठी शासनाकङे धाव घेतली आहे.आखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने रायगङ जिल्हाधिकारी निधी चौधरी याना निवेदन देण्यात आले .

कोरोना संसर्गात लाॅकङाऊन संपल्यानंतर अनेक व्यवहार पूर्ववत झाले.परंतु मंदिर उघङण्याबाबत निर्णय झालेला नाही. महाराष्ट्रात गुरव समाजाची लोकसंख्या तीस लाखाच्या घरात आहे. समाजातील अनेक कुटूंब पिढीजात व्यवसाय करित आहेत. सध्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने गुरूवारी आखिल गुरव समाज संघटनेचे रायगङ जिल्हाध्यक्ष प्रमोद खोङागळे याच्या नेतृत्वात रायगङ जिल्हिधिकारी निधी चौधरी याना निवेदन देण्यात आले.

मंदिर बंद असल्याने गुरव समाजाला अर्थसाय्य मिळावे,इनामवर्ग तीन जमिनीवर पीककर्ज मिळावे,सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये 10 टक्के प्रतिनिधित्व मिळावे,60 वर्षावरिल पूजा-याना निर्वाहभत्ता मिळावा,जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह असावे यासह विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्ह्यातून संघटनेचे सुरेश गुरव,विजय ठोसर,अमोल गुरव,योगेश गुरव,मनोज गुरव ,विशाल गुरव, भालचंद्र गुरव , सुधाकर खोडागळे , चिंतामणी खोडागळे , श्रीकांत खोडागळे व धनंजय खोडागळे उपस्थित होते.

जवळपास अकरा मागण्याच निवेदन  जिल्हाधिकारी याना दिले आहे.मुख्यमंञी यानी या प्रश्नी लक्ष घालून गुरव समाजाला न्याय द्यावा.

अमोल गुरव-  युवाध्यक्ष कोकण विभाग महाराष्ट्र राज्य

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.