Press "Enter" to skip to content

माथेरान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या उपस्थितीत राष्ट्र पुरुषांना अभिवादन !

सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान । 🔶🔷🔷🔶

२ ऑक्टोबर या राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे दुसरे आदरणीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त माथेरान नगरपरिषदेच्या कार्यालयात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी नगरसेवक नरेश काळे, माजी बांधकाम सभापती, नगरसेवक शकील पटेल, कार्यालय अधीक्षक रणजीत कांबळे यांसह अन्य कार्यालय कर्मचारी वर्ग, नागरिक उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.