Press "Enter" to skip to content

वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्यावतीने स्वच्छता अभियान

महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त राबविले विविध उपक्रम 🔶🔷🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔶🔶🔷🔷

वासांबे मोहोपाडा येथील शिवांजली इमारतीच्या ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त परीसरात विविध कार्यक्रम पार पडले.

जयंतीनिमित्ताने कार्यालयात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. यावेळी ग्रामपंचायत सरपंच ताईं पुंडलिक पवार, उपसरपंच राकेश बाबूराव खारकर व सर्व सन्माननीय सदस्य व कर्मचारी वर्गं यांनी उपस्थित राहून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी केली. यावेळी सरपंच ताईं पवार यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.यानंतर राष्ट्रपुरुषांना पुष्पहार घालण्यात आले.

दरम्यान महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त मोहोपाडा येथील जिल्हा परिषद शाळे जवळील रस्ता तसेच श्री समर्थ बैठक हाॅलसमोरील रस्ता सफाई करण्यासाठी ग्रामपंचायत कमिटीच्या पदाधिकारी व सदस्यांनी हातात झाडू ,घमेले, फावडे, तारेचा पंजा घेवून परिसर स्वच्छ केला.यानंतर परीसर स्वच्छ करण्याची ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांनी शपथ घेतली.

याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, सदस्य,स्वच्छता कर्मचारी व इतर कर्मंचारी उपस्थित होते.महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीने राबविलेल्या उपक्रमांचे नागरिकांनी कौतुक केले.यावेली सोशल डिस्टिंक्शनचे तंतोतंत पालन करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.