Press "Enter" to skip to content

रास्त भाव धान्य दुकान व केरोसीन परवाने मंजूर करावे

नवीन दुकानांसाठी जाहिरनामा प्रसिध्द करण्यात यावा – भरत पाटील

सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी

रास्त भाव धान्य दुकान व केरोसीन परवाने मंजूर करण्यात येवून नवीन दुकानांसाठी जाहिरनामा प्रसिध्द करण्यात यावा असे आदेश शासन स्तरावर पारित करण्यात आले आहेत त्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ रॉकेल विक्रेता वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष व पनवेल तालुका शिवसेना संघटक भरत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे लेखी निवेदनाने केली आहे. 

  नवीन दुकानांसाठी जाहिरनामा प्रसिध्द करण्यांचे शासकीय स्तरावरून आदेश पारित करण्यांत आलेले होते व आहेत सन २०१ ९-२० मध्ये सार्वत्रिक निवडणूकांच्या अनुषंगाने आचारसंहितेचा भंग होवू नये म्हणून शासन निर्णय दि .०१ / ०८ / २०१७ , मध्ये दिलेल्या वेळा पत्रकानुसार रास्त भाव धान्य दुकान व केरोसीन परवाने मंजूर करण्यांची कार्यवाही होवू शकली नाही त्यामुळे पनवेल तालुक्यातील अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत , विषयांकित आदेशानुसार सार्वत्रिक निवडणूकांच्या अनुषंगाने आचारसंहिता काळात व काही दुकानदारांनी पूर्वी राजीनामे दिल्यामुळे सदरची दुकाने तात्पुरत्या स्वरूपात महिला दुकानदारांना लाभार्थी कार्डधारकांची पर्यायी व्यवस्था म्हणून चालविण्यांस देण्यात आलेली आहेत. ती दुकाने  कोरोना सारख्या महामारीत महिला दुकानदार ईमाने इतबारे आपला जीव  धोक्यात घालून लाभार्थी कार्डधारकांची सेवा करीत आहेत , त्यांना कोरोनाच्या महामारीत पुकारलेल्या संचारबंदीत कोणीही नागरिक उपाशी राहू नये म्हणून शासन निर्णयाचे काटेकोर पालन करताना दिसून येतात. त्यांची तात्पुरती स्वरूपात जोडण्यांत आलेली दुकाने प्राधान्याने पुर्ववत मंजूर करणे आवश्यक व गरजेचे आहे.

परंतु प्रस्तुतच्या प्रकरणी अदयाप पर्यंत जिल्हा व तालुका पातळीवर निर्णय घेण्यांत आलेले नाहीत अशी अनेक प्रकरणे तालुका पातळीवर विनाकारण  प्रलंबित आहेत , तसेच रास्त भाव धान्य व रॉकेल परवाना नुतणीकरन करणे बाबत अनेक दुकानदारांनी  संघटनेच्या पदाधिका यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे वास्तविक पहाता धान्य व रॉकेल परवाना धारकानी परवाना नुतनीकरण फी शासनाकडे आदा केल्यानंतर , परवाना धारकाची जबाबदारी संपते परवाना नुतनीकरण करणे अथवा करून घेणे या बाबतीत सर्व अधिकार संबधित अधिका यांना शासनाने वेळोवेळी दिले आहेत , तरी सुध्दा परवाने नुतनीकरण करण्यास विलंब होत आहे.तसेच हेतुपुरस्कर दुकानदारांना नुतनीकरण फी चलन भरण्यास अनेक त्रुटी सांगून मज्जाव करतात . सवव , आपणांस विनंती करण्यात येते की विषयांकित प्रश्नावावत सन २०१७ च्या पत्रानुसार तसेच त्यापूर्वी महिला बचत गटांना व व्यक्तिना धान्य व रॉकेल परवाना देणेत आले होते , त्यांनी वर्षानुवर्षे तसेच कोरोना महामारीत ज्यानी विना तकार सेवा दिलेली आहे , त्यांना परवाना देणे आवश्यक आहे जेणे करून शासनाचा वेळ व खर्च वाचेल , याबाबत तहसिलदार पनवेल यांच्याकडून सुस्पष्ट अहवाल प्राप्त करून घ्यावा अशी  मागणी रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ रॉकेल विक्रेता वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष ,व पनवेल शिवसेना संघटक भरत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.