Press "Enter" to skip to content

सार्वजनिक बांधकाम उपविभागात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी


सिटी बेल लाइव्ह । कर्जत (संजय गायकवाड) 🔶🔷🔷🔶


सार्वजनिक बांधकाम उपविभाग कर्जत कार्यालय 1 व 2 मध्ये आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय कर्जत 1 व 2 कार्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त आदरांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय अभियंता आजयकुमार सर्वगोड यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी शाखा अभियंता अक्षय चौधरी, प्रदीप माळी, सुजित कालेकर, विशाल पवार, कुणाल गोसावी, तयबा चिकटे, कीर्ती कुंजीर, निलिमा हजारे, अक्षय उंदेरकर, ठेकेदार शरद बडेकर आदी सह कर्मचारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.