Press "Enter" to skip to content

वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीत गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔶🔷🔷🔶

वासांबे मोहोपाडा येथील शिवांजली इमारतीच्या ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त परीसरात विविध कार्यक्रम पार पडले.

जयंतीनिमित्ताने कार्यालयात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. यावेळी ग्रामपंचायत सरपंच ताईं पुंडलिक पवार, उपसरपंच राकेश बाबूराव खारकर व सर्व सन्माननीय सदस्य व कर्मचारी वर्गं यांनी उपस्थित राहून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी केली.

यावेळी सरपंच ताईं पवार यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.यानंतर राष्ट्रपुरुषांना पुष्पहार घालण्यात आले.
दरम्यान महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त मोहोपाडा येथील जिल्हा परिषद शालेजवलील रस्ता तसेच श्री समर्थ बैठक हाॅलसमोरील रस्ता सफाई करण्यासाठी ग्रामपंचायत कमिटीच्या पदाधिकारी व सदस्यांनी हातात झाडू ,घमेले,फावडे,तारेचा पंजा घेवून परिसर स्वच्छ केला.

यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य,स्वच्छता कर्मचारी व इतर कर्मंचारी उपस्थित होते.महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीने राबविलेल्या उपक्रमांचे नागरिकांनी कौतुक केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.