– आ. अनिकेत तटकरे यांची ग्वाही 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । (महेश पवार) : 🔶🔶🔷🔷
विद्यार्थी वर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेची स्थापना झाली असून ही संघटना नेहमीच शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर राहील अशी ग्वाही विधानपरिषदेच्या कोकण मतदार संघाचे आमदार अनिकेत तटकरे यांनी राष्ट्वादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांना दिली.
सुनिल गव्हाणे यांनी सुतारवाडी येथील “गीताबाग” मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आ. अनिकेत तटकरे यांची भेट घेऊन संघटने संदर्भातील विविध विषयांवर चर्चा केली. त्यावेळी आ. अनिकेत तटकरे यांनी राष्ट्वादी विद्यार्थी संघटनेच्या रायगड जिल्ह्यातील संघटनेच्या कार्याबद्दल व संघटना बांधणी संदर्भात सविस्तर चर्चा केली .
यावेळी राष्ट्वादी विद्यार्थी संघटनेचे रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करणे, शैक्षणिक क्षेत्रात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची भूमिका आणि एक कार्यकर्ता म्हणून असलेली जबाबदारी या विषयांवर सखोल चर्चा झाली.
यावेळी रायगड जिल्ह्यात विद्यार्थी संघटना अधिक सक्षमपणे व प्रभावीपणे काम करण्याच्या दृष्टीने माझे सहकार्य याआधीही रहिलेले आहे व यापुढेही राहणार असल्याचे आ. अनिकेतभाई तटकरे यांनी आवर्जून सांगितले. तसेच येत्या काळात शैक्षणिक क्षेत्रात नवीन पर्याय उपलब्ध होत असताना त्या-त्या ठिकाणी आपली विद्यार्थी संघटना प्रभावीपणे उभी रहायला हवी. समस्या मार्गी लावण्यासोबतच विद्यार्थ्यांना योग्य प्रकारचे मार्गदर्शन सुध्दा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, अशा सूचनाही यावेळी आ. अनिकेत तटकरे यांनी दिल्या.
दरम्यान विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी यावेळी रायगड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना संघटना वाढीसाठी काही महत्वपूर्ण टिप्स देवून विद्यार्थ्यांच्या हितासाठी कायम दक्ष राहण्याच्या सल्ला दिला.








Be First to Comment