धुतूम ग्रामपंचायतीने राबविले प्लास्टिक पिशवी बंदी अभियान 🔷🔶🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / उरण ( अजित पाटील ) 🔷🔷🔶🔶
आज २ ऑक्टोंबर २०२० “महात्मा गांधी जयंती” चे औचित्य साधून धुतूम गावात संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान म्हणजेच “स्वच्छ भारत अभियान” अंतर्गत “प्लास्टिक पिशवी बंदी” कार्यक्रम चालू झाला आहे.
शासनाच्या “स्मार्ट विलेज” अंतर्गत मिळालेल्या बक्षिस रकमेतून नागरिकांना कापडी पिशवी वाटप धुतूम ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये शासनाच्या निकशा प्रमाणे प्लास्टिक बंदी व त्या वर उपाय योजना म्हणून प्रत्येक परिवारास १० पिशव्यांचा सेट देण्यात आले. सोबत GTI terminal port तेर्फे कोरोणा प्रादुर्भाव चा विचार करून दोन मास्क व दोन मेडीमिक्स छोटे साबन देण्यात आले.

दिनांक २८/०९/२०२० ते ३०/०९/२०२० तीन दिवसात वार्ड नुसार, ग्रामपंचायत कार्यालयात दिलेल्या वेळेत मास्क लाऊन व सुरक्षित अंतर ठेऊन नागरिकांना गर्दी न करता रांगेत उभे राहून वाटप करण्यात आले. सदर कापडी पिशव्या ह्या धुतूम गावातील “महिला बचत गटांनी” बनविल्या आहेत.

या आगोदर गावातील दुकानदारांना या उपक्रम बद्दल माहिती व त्यांच्या समस्या, त्या वर उपाय योजना, याचे नियोजन करण्यात आले, दुकानदारांच्या सहकार्य शिवाय हा उपक्रम पूर्ण होणार नाही याची त्यांना कल्पना दिली.
आज या दिवशी “महात्मा गांधी जयंती” ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ रेश्मा शरद ठाकुर यांच्या हस्ते “महात्मा गांधी” व “माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री” आणि “संत गाडगे महाराज” यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली, तसेच या कार्यक्रमाला माजी जि. प. सदस्य श्री वैजनाथ ठाकुर यांनी विशेष उपस्थिती लावली.
या प्रसंगी उपसरपंच सौ आशा महेंद्र ठाकुर, माजी उपसरपंच सौ वैशाली किशोर पाटील, माजी उपसरपंच श्री सदानंद विठ्ठल ठाकुर, सदस्या सौ सविता रुपेश ठाकुर, सौ पूजा लक्ष्मण ठाकुर, सदस्य श्री शरद ठाकुर, ग्रामशेवक श्री विनोद मोरे साहेब, ग्रामपंचायत लिपीक सुजाता ठाकुर व कर्मचारी वर्ग यांच्या सोबत “स्वच्छता शपत” घेण्यात आली.

या वेळी सरपंच वतीने नागरिकांना तसेच दुकानदारांना विनम्र आवाहन करीत आहोत की “प्लास्टिक पिशवी बंद करा, प्रदूषण टाळा, येणाऱ्या संकटाला आजच टाळा””














Be First to Comment