Press "Enter" to skip to content

कूपोषीत रूक्मीनीच्या मदतीला धावले प्रकल्प आधीकारी

कपडे आणी धान्याची केली मदत 🔶🔷🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड) 🔶🔶🔷🔷

कर्जत तालुक्यातील अरवंद येथील रूक्मीनी शीवराम पवार या अतीतीव्र कूपोषीत श्रेणीतील एका 4 वर्षीय आदिवासी मुलीच्या मदतीला एकात्मिक बालविकास चे प्रकल्प आधिकारी सरसावले असुन राष्ट्रीय पोषण माह अभीयानाचे औचित्य साधत रुक्मिणीच्या आईला व इतर भावंडाना नवीन कपडे, व महिणाभर पूरेल एवढे धान्य प्रत्यक्ष घरी जाउन वाटप करण्यात आले.

कर्जत तालूका हा कूपोषण संख्या जास्त असलेला तालूका असून शासनाच्या विवीध योजना आणी विवीध शासकीय विभागात समन्वय करत कूपोषण कमी करण्याचे सातत्याने प्रयत्न केले जात आहे. सप्टेंबर महिना हा देशभर राष्ट्रीय पोषण माह म्हणुन शासन स्तरावर साजरा केला आहे. या पोषण माहचे औचित्य साधून कर्जत येथील एकात्मीक बालविकास प्रकल्प एक चे प्रकल्प आधिकारी अनिकेत पालकर यांनी अरवंद येथील अंगणवाडी मधील रूक्मीनी शिवराम पवार या अतीतीव्र (सँम) श्रेणीतील कूपोषित मुलीला दत्तक घेतले असून या मुलीला साधारण श्रेणीत आणे पर्यत तीला शक्य तेवढी वैयक्तिक स्वरुपात मदत करण्याची तयारी दर्शवीली आहे.

विधवा आणी अपंग आई, विधवा आजी व तीन भावंडे, स्वता:चे पक्के घर नाही, आधार कार्ड व जातीचा दाखला नसल्या मूळे इतर शासकीय योजनाचा लाभ नाही अशातच कोरोना महामरीत रोजगार नसल्यामूळे उपासमारीची वेळ आलेल्या रूक्मीनी व तीच्या कुटुंबियांना पालकर यांनी एक महिनाभर पूरेल एवढे धान्य व नवीन कपड्याची मदत प्रत्यक्ष वाडीवर जाऊन वाटप केली आहे. पालकर याच्या मदतीने रूक्मीनीला व तीच्या कुटुंबियांना मोठा आधार मिळाला आहे . या पूर्वी पालकर यानी मूळगाव येथील डायबेटीस ग्रस्त एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीला पण ओषध उपचारा साठी आर्थीक मदत केली होती.

राष्ट्रीय पोषण माह चे औचित्य साधून रुक्मिणी या कूपोषीत मूलीला दत्तक घेतले असून या ही पुढे तीला नियमीतपणे माझ्या वैयक्तिक स्वरूपात मदत देणार आहे तसेच शासनाच्या इतर योजनाचा पण लाभ देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

अनीकेत पालकर - एकात्मिक बालविकास चे प्रकल्प आधिकारी
रूक्मीनीही मागच्या वर्षी आपण चालू केलेल्या बाल उपचार केंद्रात दाखल होती त्यावेळी तीच्या आईला अंत्योदय योजनेचे रेशन कार्ड तातडीने बनवून दिले आहे, तसेच संजय गाधी निराधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव तहसील कार्यालयात सादर केला आहे. तीचे आधार कार्ड बनविणे, घराखालील जागा मीळवून घरकूल लाभ देणे या साठी आमच्या संस्थे कडून आम्ही प्रयत्न करत आहोत.पालकर याचे प्रमाणेच जर तालूक्यातील प्रत्येक प्रशासकीय आधिका-याने एक एक मूल दत्तक घेतले तर निश्चितच तालूक्यातील कूपोषण प्रश्नाची तीव्रता कमी होऊ शकेल.

अशोक जंगले - कँन प्रकल्प समन्वयक

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.