Press "Enter" to skip to content

कर्जतमध्ये विभागवार प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी

नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या देखरेखीखाली माझे कुटुंब माझी जबाबदारी आरोग्य तपासणी मोहीम ! 🔷🔶🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । भिसेगाव – कर्जत । सुभाष सोनावणे ।🔷🔷🔶🔶

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माझे कुटुंब , माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत कर्जतमध्ये विभागवार प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी कर्जतच्या प्रथम नागरिक व कर्जत नगर परिषदेच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ . सुवर्णा केतन जोशी यांच्या देखरेखीखाली सुरू असून नागरिकांचा देखील या मोहिमेस उत्स्फूर्त सहयोग मिळत आहे .

नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ३ दहिवली परिसरामध्ये “माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे”साठी नागरिकांची तपासणी आज करण्यात आली यावेळी माहीती घेताना आरोग्य पथक , नगराध्यक्षा सौ. सुवर्णा जोशी , बांधकाम सभापती विवेक दांडेकर, विरोधी पक्ष नेते शरद लाड , विजय जिनगिरे ,आरोग्य कर्मचारी सुदाम म्हसे ,रमेश लाड,डॉक्टर पवार आदी उपस्थित होते ,तर प्रभाग क्रमांक ५ मुद्रे परिसरात “माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे”साठी तपासणी आणि माहीती घेताना आरोग्य पथक , नगराध्यक्षा सौ. सुवर्णा जोशी , पाणीपुरवठा सभापती श्री. बळवंत घुमरे, नगरसेविका संचीता पाटील ,आरोग्य कर्मचारी सुदाम म्हसे ,डॉक्टर पवार आदींनी उपस्थित राहून नागरिकांची तपासणी केली .

त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक ७ पाटील आळी परिसरात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत नगराध्यक्षा सौ. सुवर्णा केतन जोशी ,आरोग्य कर्मचारी बापू खोंडे, निघोजकर मॅडम, महेंद्र चंदन, हरिश्चंद्र वाघमारे आदी उपस्थित राहून तपासणी केली .

आजपर्यंत ५४९४ घरातील १८७१४ नागरिकांची तपासणी केली आहे . त्यामुळे कोरोना महामारीवर येणाऱ्या काळात नक्कीच अटकाव होईल व शासनाच्या या मोहिमे अंतर्गत कोरोना हद्दपार होईल , असा विश्वास वाटतो , असे मत नगराध्यक्षा सौ . सुवर्णा केतन जोशी यांनी व्यक्त केले .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.