Press "Enter" to skip to content

घरबैठे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन


सिटी बेल लाइव्ह । उरण (घन:श्याम कडू) । 🔶🔷🔶🔷

उरण तालुक्याला मंजूर झालेल्या जागेवर हॉस्पिटल तातडीने उभारण्यात यावे या मागणीसाठी उरण सामाजिक संस्थेतर्फे गांधी जयंतीचे औचित्य साधत २ ऑक्टोबर रोजी घरबैठे मागणी आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या घरबैठे आंदोलनात उरणकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन उरण सामाजिक संस्थेने केले आहे.

उरण सामाजिक संस्थेच्या प्रयत्नामुळे आणि तत्कालीन आमदार विवेक पाटील व मनोहरशेठ भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे उरण तालुक्याला उपजिल्हा हॉस्पिटलसाठी प्लॉट नंबर १, सेकटर १५ ए, द्रोणागिरी उरण येथे ५९८३ चौमी भूखंड २०१३ साली मंजूर झाला आहे. त्याला ६ वर्षांचा अवधी उलटूनही अद्याप कामाला सुरुवात नाही.

सदर हॉस्पिटल असते तर आजच्या कोरोनाच्या महामारीत उरणकरांचे अनेकांचे प्राण वाचून उपचारही उरणमध्येच झाले असते. मजूर झालेल्या ठिकाणी हॉस्पिटलचे काम त्वरित सुरू व्हावे यासाठी उरण सामाजिक संस्थेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते १२ या दरम्यान १ तासाचे उरणच्या जनतेचे घरबैठे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनात उरणच्या जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समस्त उरणकरांना उरण सामाजिक संस्थेने केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.