मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यत पोलीस भरतीला प्रक्रियेला स्थगिती द्या ! अन्यथा ५ ऑक्टोबरला आंदोलन 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन ।🔶🔶🔷🔷
मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असताना शासनाच्या माध्यमातुन राज्यात मोठया प्रमाणात पोलीस भरतीचा घाट घातला जात आहे. हा सरळसरळ मराठा समाजावर अन्याय करणारा निर्णय ठरू शकतो.त्यामुळे जो पर्यत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही.तोपर्यत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तो पर्यत शासनाने राज्यात कोणत्याही खात्याची भरती करू नये.राज्य सरकाराने दिलेले मराठा आरक्षण कायम ठेवा , सर्वेच्च न्यायालयाने “एसईबीसी” मराठा आरक्षणाचा विषय घटनापीठाकडे सुपुर्त करताना जो स्थगिती आदेश दिला आहे.त्यामुळे मुख्यमंत्री महोदयानी जाहीर केल्याप्रमाणे घटना तज्ञांचा व कायदेविषयक तज्ञांचा सल्ला घेवुन सदरची स्थगिती उठविण्यासाठी आवश्वक ती कायदेशीर बाब अवलंबित करावी व मराठा आरक्षण खंडीत होवु न देता पुर्ववत चालु ठेवावे.मराठा आरक्षाणावरील स्थगिती उठविण्यासाठी शासनाने तात्काळ प्रयत्न करावेत, अन्यथा ५ऑक्टोबरला आंदोलन छेडण्यात येईल, ..असा इशारा मुरूड तालुका मराठा क्रांती मोर्चा वतीने देण्यात आला आहे.
या संदर्भातला लेखी निवेदन मुरूड तहसिलदार-गमन गावित यांना देण्यात आले आहे.
यावेळी दत्तात्रेय भोसले , राजन मानकर , वसंत गायकर , विजय सुर्वे,भरत बेलोसे , सुनील चाळके, अशोक चाळके ,दर्शना शिर्के , सुवर्णा पवार , वसुंदा गायकर , सध्या बेल , शालिनी दळवी , रूषीला पतने , स्मिता पतने , वर्षा धनावडे , लिलावती घाग पदाधिकारी अनेक समाज बांधव हजर होते.

यावेळी प्रथम मुरूड शहरातील दत्तवाडी येथील राजे शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दत्तात्रेय भोसले यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवुन छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी , एक मराठा लाख मराठा आश्या यावेळी घोषणा देण्यात आल्या.मराठि क्रांती मोर्चाने सोशल डिस्टन नियम पाळुन मुरूड तहसिलदार कार्याल्या प्रागणांत जमा झाले आले.
या मोर्चाला सबोधित करताना दत्तात्रेय भोसले म्हणाले की पहिले आम्ही या महाआघाडीचा सरकाराचा निषेध करतो आज मराठा समाजावर अन्याय झाला आहे.
आम्ही राज्यघटनेचा आणि न्याय व्यवस्थेचा आदर करतो. मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे. राज्य सरकारने व्यवस्थित पाठपुरावा न केल्याने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थिगिती मिळाली आहे.हा सर्व प्रकार मराठा समाजाचा विश्वासघात व फसवणूक करणारा आहे. शासनाने तात्काळ आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करावेत. अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल. असा इशारा मुरूड मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने दत्तात्रेय भोसले यांनी देण्यात आला आहे.तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यत पोलीस भरतीला प्रक्रियेला स्थगिती द्या तसेच मराठा आरक्षावरील स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करावेत अन्यथा ५ऑक्टोबरला रस्तावर उतरून आंदोलन करू आसा इशारा ही सरकारला देण्यात आला आहे.








Be First to Comment