४२ जणांवर उपचार सुरू, ४५५ जण कोरोनामुक्त,१३ मयत 🔷🔶🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।🔷🔷🔶🔶
कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळित केले आहे. कोरोना संसर्गं कधी, कुठे, कसं, कुणाला, कशाप्रकारे गाठुन वेठीस धरेल हे कुठलाही ज्योतीषी वा तज्ञही सांगु न शकणारी सत्य आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
रसायनी परीसरातील वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद हद्दीत कोरोनाने आपली दहशत निर्माण केली आहे.यातच तालुक्यात इतर भागापेक्षा कोरोनाचे रुग्ण वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत वाढतच असल्याने चिंतेची बाब असली तरी वीस सप्टेंबरनंतर रुग्णवाढ संख्येत बरीच घट झाली असून बरे होण्याचे प्रमाणही जवळपास ७५ टक्के आहे.
मात्र पितृपक्षानंतर कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीचा आलेख दिलासादायक असल्याचे दिसून येत आहे. वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागातील कोरोनाग्रस्तांची ३०सप्टेंबरअखेर झालेली आकडेवारी
चांभार्ली ग्रामपंचायत हद्दीत एकूण ५५ कोरोनाग्रस्त,बरे झालेले रुग्ण ४७ ,मयत ०२,उपचार घेत असलेले रुग्ण ०६
लोधिवली ग्रामपंचायत हद्दीत एकूण ५५ कोरोनाबाधित ,बरे झालेले ५१ ,मयत एक, उपचार सुरू असलेले रुग्ण ३
वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत एकूण ४०० रुग्ण, एकूण बरे ३५७ रुग्ण, एकूण मयत १० रुग्ण, उपचार सुरू असलेले ३३ रुग्ण
दरम्यान सप्टेंबरअखेर चौक मंडलात एकूण ८०४ रुग्ण संख्या असून एकूण ३३ जण मयत झाले आहेत.खालापूर तालुक्यात वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत कोरोनारुग्णांची संख्या लक्षणीय असून वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत कोरोनासंसर्गांचा आलेख आॅक्टोंबर महिन्यातील नवरात्रोत्सवानंतर दिलासादायक राहणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.तरीही नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडता आपली सोशल डिस्टिंक्शनचे पालन करुन शासनाने “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’या मोहिमेचे पालन करुन आपल्या कुटुंबाची खबरदारी घ्यावी असे आवाहन होत आहे.








Be First to Comment