Press "Enter" to skip to content

कोन येथे एकात्मिक बाल विकास सेवा अभियान कार्यक्रम उत्साहात संपन्न

सिटी बेल लाइव्ह । रसायनी–राकेश खराडे 🔷🔶🔶🔷

कोन गावांतील अंगणवाडी १ व २ काळुंद्रे बिट प्रकल्प अंतर्गत पोषण अभियान हा कार्यक्रम कोन गावी उत्साहात संपन्न झाला. सध्या शासनातर्फे 8 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत सर्वच अंगणवाड्यांमध्ये हा कार्यक्रम राबवला जात आहे. या कार्यक्रमासाठी कोन ग्राम पंचायतीचे सरपंच निलेश म्हात्रे, ग्रामसेवक रमेश तारेकर तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी चेतन गायकवाड,पर्यवेक्षिका-वनिता वाघ,अंगणवाडी सेविका-अस्मिता म्हात्रे,राजश्री म्हात्रे व मदतनीस-सुवर्णा मनोरे,अनिता शिसवे आणि आरोग्य विभागाच्या एस.एस.मिरचकर उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात भव्य अशी रांगोळी काढण्यात आली होती.त्यात मुलांच्या पोषण आहारा संबंधित खाद्यपदार्थ, पालेभाज्या व काही घोषवाक्ये सुद्धा काढली होती.”सही पोषण-देश रोशन” “माझी कन्या भाग्यश्री” “बेटी बचाओ-बेटी पढाओ” पोषण अभियान पोषण आहार-२०२० अशी सुंदर रांगोळी काढून सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी पोषण अभियानावर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.