Press "Enter" to skip to content

पेण तालुकाध्यक्ष पदावर अशोक मोकलच कायम राहणार

प्रदेश काँग्रेसने दिली हिराजी पाटिल यांच्या निवडीला स्थगिती 🔶🔷🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । पेण (प्रतिनिधी) 🔶🔶🔷🔷

19/9/2020 रोजी अचानक पेण तालुका अध्यक्षपदी हिराजी पाटिल यांची नियुक्ति झाली आणि सर्व काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांना धक्काच बसला.

अशोक मोकल ह्यांनी अत्यंत कठिण परिस्थित पेण तालुका काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची संघर्ष यात्रा पेण येथे येणार होती सदर यात्रेबाबत माजी रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आर. सी. घरत यांनी पेणचे सर्व कार्यकर्ते व ज्येष्ठ नेते यांच्याशी चर्चा करून पक्षाचे निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते अशोक मोकल यांची दिनांक 10/1/2019 रोजी पेण काँग्रेसचे प्रभारी तालुका अध्यक्ष म्हणून नेमणूक केली पुढे नवनिर्वाचित रायगड काँग्रेस अध्यक्ष माणिकराव जगताप यांनी 23/3/2019 रोजी अशोक मोकल यांना तालुका अध्यक्ष पदाचे नियुक्ति पत्र दिले आहे.मात्र अचानक हिराजी पाटील यांची तालुकाध्यक्ष पदी निवड केल्या मुळे तातडीने काॅग्रेस कार्यकर्त्यानी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची सदिच्छा भेट घेवून अशोक मोकल यांचा दिड वर्षाच्या कालावधीचा कार्यअहवाल सोपावला. तेव्हा प्रदेश काँग्रेसने हिराजी पाटिल यांच्या निवडीवर स्थगिती दिल्याचे सांगितले व अशोक मोकल यांनाच तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळण्याची सूचना केली आहे.

आवश्यक ठिकाणी बदलण्यात येणाऱ्या तालुका अध्यक्षांची प्रस्तावित नावे प्रदेश काँग्रेसने मागवल्याचे समजते त्यामुळे प्रदेश काँग्रेसकडून मंजूरी नसल्याने अशोक मोकल हेच पेण तालुका काँग्रेस अध्यक्ष म्हणून काम पाहतील अशी सूचना प्रदेश काँग्रेसने दिली असल्याची माहिती नंदा म्हात्रे यांनी दिली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.