Press "Enter" to skip to content

सिटिबेल लाइव्ह च्या बातमीची उरण नगर परिषदेने घेतली दखल


शासकीय स्मारकाची केली सफाई 🔷🔶🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । उरण । रमेश थळी । 🔷🔷🔶🔶

उरण शहरातील पालिकेच्या शासकीय स्मारका जवळ अनेक महिन्यांपासून रस्ता व गटारांची कामे सुरू होती. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन दिवसांवर आली असता या स्मारका समोर असलेले मातीचे ढीग हटवावे या मथळ्याखाली सिटिबेल लाइव्ह ने २८ सप्टेंबर रोजी बातमी प्रसिद्ध केली.

या बातमीची दखल उरण नगर परिषदेने घेवून स्मारका समोरील माती व दगड उचलून परिसराची साफसफाई करून हा परीसर स्वच्छ करण्यात आला आहे. या स्वच्छते बद्दल उरण मधील स्वातंत्र्य सैनिक व सामाजिक कार्यकर्ते नागरीक सिटीबेल लाइव्ह व नगर परिषदेचे आभार मानून धन्यवाद देत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.