Press "Enter" to skip to content

तळवली ग्रामस्थांनी श्रमदानातून विविध कामे लावली मार्गी


सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे) 🔶🔷🔷🔶

रोहे तालुक्यातील श्री क्षेत्र तळवली येथील ग्रामस्थांनी संघटितपणे एकत्रित येऊन श्रमदान करून विविध कामे मार्गी लावली आहेत.

येथील गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या नळपाणी योजनेतंर्गत विद्युत पुरवठा करणारी डिपी ही थोडी जुनी झाल्याने तसेच वारंवार बिघाड होत असे.

अशावेळी गावाला पाणी पुरवठा करताना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असे.याबाबत कोलाड विद्युत कार्यालयात
डिपीची मागणी करून नव्याने मिळालेली डिपी बसविणे कामी ग्रामस्थांनी मोठे श्रमदान केले.तसेच पावसामुळे ग्रामस्थांच्या नेहमीचे वहिवाटीचे रस्तेही श्रदानातून दुरूस्त करून ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासातून सुटका करण्यात आली आहे.

आजच्या स्थितीत गाव पातळीवर संघटन कौशल्य लोप पावत असतानाच तळवली ग्रामस्थांनी मात्र संघठणातून सर्व काही सहजसाध्य होत असल्याचे दाखवून दिले आहे.

श्री क्षेत्र तळवली हे गाव धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रात नावाजलेले गाव असल्याने यापुर्वीही विविध प्रकारची सार्वजनिक कामे संघठितपणे एकत्रित येऊन श्रमदानातून मार्गी लावली असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.