कोकण अध्यक्ष सतिश वैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील युवकांचे संघटन मजबूत होत आहे -: खासदार रामदास तडस 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड (विश्वास निकम) 🔶🔶🔷🔷
आम्ही तेली युवा संघटनेच्या वतीने कोकणासाठी भव्यदिव्य अशी वकृत्वस्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. या स्पर्धेत रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातील २वर्षे ते ७० वयोगटातील असंख्य स्पर्धक सहभागी झाले होते. नुकताच ऑनलाइन पद्धतीने स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र तैलीक महासभेचे अध्यक्ष तथा वर्ध्याचे खासदार रामदास तडस, माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे कोकण अध्यक्ष सतीश वैरागी, महासचिव डॉक्टर भूषण कर्डिले, कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे, सुनील चौधरी, साहित्यिक अरूण इंगवले, परीक्षक चंद्रकांत झगडे, विनायक राऊत, प्रभाकर खानविलकर, संतोष तेली, रघुवीर शेलार, संतोष रहाटे, तसेच आम्ही तेली युवक संघटनेचे सर्व पदाधिकारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या वेळी उपस्थित होते.
खासदार रामदास तडस यांनी यावेळी गौरवोद्गार काढताना सांगितले की, महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे अध्यक्ष सतीश वैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील युवकांचे संघटन मजबूत होत असून त्यांचा आदर्श महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांनी घ्यावा. सतीश वैरागी यांचे समाजासाठी कार्य मोलाचे असून ते शब्दात व्यक्त करणे कठीण असल्याचे खासदार रामदास तडस यांनी सांगितले.
यावेळी माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की अशी ऑनलाइन पद्धतीने आयोजित केलेली ही वकृत्व स्पर्धा म्हणजे स्पर्धकांच्या कलागुणांना वाव देणारी असून आयोजकांनी अपार मेहनत घेवून स्पर्धेचे काटेकोरपणे आयोजन केले. याबद्दल संयोजकांचे कौतुक केले.
यावेळी महासचिव डॉक्टर भूषण कर्डिले यांनी कोकणातील उपस्थिती ऑनलाइन पद्धतीने समाज बांधवांशी संवाद साधला. त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेचे कोकण अध्यक्ष मा. सतीश वैरागी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी समाज बांधव डिजिटल माध्यमातून कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
खुला गट – प्रथम सौ. स्वप्नाली विजय वाडेकर, द्वितीय कु.राजस अविनाश कदम, तृतीय श्री. प्रथमेश सुधाकर रहाटे, उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक सौ अरुणा अरुण इंगळे, द्वितीय क्र. स्नेहल संदीप रहाटे.
१२ वर्षाखालील गटात – प्रथम क्रमांक कु. गार्गी संजय बाकाळकर, द्वितीय क्र. सारा योगेश वनकर, तृतीय क्र. मुग्धा संजय राऊत, चतुर्थ क्र. कु निधी संदीप पवार, पाचवा क्रमांक कु. देवांश राजन देवळेकर, सहावा क्र. कु. शार्दुल प्रविन धोत्रे, सातवा क्र. कु. दया संदीप पवार.
सात वर्षाखालील गटात – प्रथम अर्णव संजय बाकाळकर, द्वितीय क्र. कु सोहम जितेंद्र कदम, तृतीय कु. प्रसाद महेश रसाळ, चतुर्थ कु. आराध्या अमोल पवार, पाचवा क्र कु. आरोही गणेश राऊत, सहावा क्र.कु. तन्मय प्रमोद महाडिक, सातवा क्र. कु.श्रीयोग संजय राऊत आदींनी यश संपादन केले.
सर्व यशस्वी विजेत्यांना उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. तसेच आम्ही तेली समाज युवक संघटनेमार्फत सर्व स्पर्धकांचे विशेष कौतुक करण्यात आले.








Be First to Comment